Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर , कृषी विधेयकावरून भाजपशी मतभेद

Spread the love

कृषी विधेयकावरून भाजपशी टोकाचे मतभेद झाल्यामुळे अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाने आता  गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे ती मागे घेतली जावीत अशी मागणी अकाली दलाने केली होती. त्यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलनही उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जवळे मित्र म्हणून त्यांची ओळख होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या कारणावरून बेबनाव झाल्याने शिवसेना भाजपपासून दुरावला गेला. त्यामुळे भाजप शिवसेनेची 27 वर्षांची युती तुटली होती. पंजाबमध्ये अकाली आणि भाजपची युतीही अशीच मजबूत समजली जात होती. मात्र अंतर्गत राजकारण आणि नवी समिकरणे यामुळे अकाली दलाने हा निर्णय घेतला आहे. अकाली दलाने एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्र सरकारचा पाठिंबा काढण्यावर मात्र कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. भाजपला पूर्ण बहुमत असल्याने केंद्र सरकारला धोका नाही. आपल्यापासून मित्र पक्ष का दुरावत चालले आहेत याचा भाजपने विचार करावा असं या आधीच शिवसेनेने भाजपला सुनावलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!