Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : टाईमच्या टॉप १०० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश

Spread the love

जगप्रसिद्ध टाईम  मॅगझिनने  २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली १००  व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाईम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, टाइम मॅगझिननं मोदींबाबत मतही व्यक्त केलं आहे. “लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक स्वतंत्र निवडणुकाच नाही. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या ७ दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे,” असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!