AurangabadCrimeUpdate : व्यापा-याला ५० लाखाला गंडवून फरार झालेल्या भामट्याला दिल्लीतून केले जेरबंद

औरंंंगाबाद : वाइन शॉप चा परवाना काढून देण्याची थाप मारून ५० लाखाची फसवणूक करून फरार झालेला आरोपीने दिल्लीत ज्वेलरी चे दुकान थाटले होते.सिडको पोलिसाने त्या भामट्याच्या दिल्ली येथून मुसक्या आवळल्या. दयानंद वजलू वनजे (वय ४६,रा.नांदेड) असे पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या भामट्याचे नाव आहे.
आरोपी दयानंद याने सन-२०१९ मध्ये शहरातील एका व्यापाNयाला देशी विदेशी वाईन शॉपचा परवाना काढून देतो अशी थाप मारली होती.त्याचे राहणीमान देहबोलीवर विश्वास ठेवून व्यापाNयाने वेळोवेळी ५० लाख रुपये दयानंद ला दिले होते.मात्र त्या नंतर तो पसार झाला त्याच्याशी संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाNयाने पोलिसात धाव घेतली होती.तेंव्हा पासून दयानंद हा फरार होता.
दरम्यान, दयानंद वनजे हा दिल्ली येथे सौदर्या ज्वेलर्स नावाचे दुकान चालवत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना खबNयाने दिली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सिडको पोलिसांच्या डीबी पथकाने दिल्ली येथील पटेलनगरातील मेट्रो स्टेशनजवळ सापळा रचून दयानंद वनजे याला ताब्यात घेतले.
मित्रांच्या मदतीने भावाचीच दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात
औरंंंगाबाद : मित्रांच्या मदतीने मोठ्या भावाची दुचाकी चोरून ती विक्री करणाNया लहान भावासह त्याच्या दोन साथीदारांना जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश वेंâद्रे यांनी सोमवारी (दि.३१) कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अरबाज शहा मेहमुद शहा (रा.कौसर पार्वâ, नारेगाव) असे मोठ्या भावाची दुचाकी लंपास करणाNया लहान भावाचे नाव असून पोलिसांनी त्याच्यासह शेख मुजाहेद शेख खाजा (वय १९, रा.टाईम्स कॉलनी) व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. नाजीम शहा मेहमुद शहा (वय ३५, रा.कौसरपार्वâ, नारेगाव) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एएक्स-४५६४) शेख अरबाज शहा याने आपला मित्र शेख मुजाहेद व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने २९ ऑगस्ट रोजी नारेगावातील कौसर पार्वâ येथून लंपास केली होती. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दुचाकी चोरी केल्यानंतर तिघांनी सदरील दुचाकीवर बनावट क्रमांक (एमएच-१२-डीसी-२४९२) टावूâन विक्री केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चव्रेâ फिरवून दुचाकी चोरून विक्री करणाNया तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश वेंâद्रे, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, दत्ता शेळके, वैâलास अन्नलदास, सहाय्यक फौजदार रफी शेख, जमादार संपत राठोड, मुनीर पठाण, हारूण शेख, सुनील जाधव, गणेश नागरे, शाहेद शेख, दिपक शिंदे, विक्रांत पवार, नितेश सुंदर्डे, प्रवीण टेकले आदींच्या पथकाने केली.
अट्टल दुचाकीचोर जेरबंद, चोरीच्या सहा दुचाकी जप्त
औरंंंगाबाद : लेबर कॉलनी परिसरातील मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटून चोरी करणाNया चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजार रूपये विंâमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. अनिस उर्पâ बाबा खलील खान (ह.मु.सईदा कॉलनी) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
लेबर कॉलनी परिसरातील एस.एम. मेडिकल स्टोअर्स आणि जनरल स्टोअर्सचे शटर उचकटून अनिस उर्पâ बाबा खान याने चोरी केली होती. दुकानातून बाहेर पडत असतांना शटरचा आवाज झाल्याने शेजाNयांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहुन अनिस उर्पâ बाबा खान हा फाजलपुNयातील नाल्यात जाऊन लपला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने मेडिकलचे शटर उचकटून चोरी केली असल्याची कबूली दिली. तसेच पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. अनिस उर्पâ बाबा खान हा रेकॉर्ड वरील अट्टल चोरटा असून शहरातील विविध पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मोहसीन सय्यद, डीबी पथकाचे उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, जमादार अप्पासाहेब देशमुख, संजय नंद, संदीप तायडे, शेख गफ्फार, बालाजी तोटेवाड, माजीद पटेल, अशोक कदम, भोटकर, म्हस्के, होमागार्डचे जवान शेख अख्तर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.