Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : मृत्यूदर घाटत नसल्यामुळे राज्याची स्थिती चिंताजनक , दिवसभरात 364 जणांचा मृत्यू , 12608 नवे रुग्ण, 10484 रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर तब्बल ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात एकीकडे रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असला तरी राज्यातील कोरोना मृतांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक आहे. काही केल्या मृत्यूदर घाटात नसल्यामुळे राज्याची स्थिती चिंताजनक आहे.  आज तब्बल ३६४ करोनाबाधित रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने  राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या १९ हजार ४२७ इतकी झाली आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मृत्यूदर ३. ३९ % इतका आहे.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ लाख ७२ हजार ७३४ इतका झाला आहे. तर, गेल्या २४ तासांत १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ०१ हजार ४४२ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.०९ % इतकं झालं आहे. राज्यात एकूण १ लाख ५१ हजार ५५५ अॅक्टिव्ह रुग्ण असून विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ चाचण्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ (१८.८ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात १० लाख ३२ हजार १०५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ३७ हजार ३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंची माहिती

आज निदान झालेले १२,६०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१),अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२), सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१), अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!