Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांच्या निधनाने अवघे शायरी विश्व हळहळले , मोठा शायर काळाच्या पडद्याआड ….

Spread the love

तरुणाईमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ या शेरचे प्रसिद्ध उर्दू शायर राहत इंदौरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे देशातील एक मोठा शायर काळाच्या पडद्याआड गेला. ते ७० वर्षांचे होते. राहत इंदौरी यांना करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर  त्यांना इंदोरमधील अरबिंदो इस्पितळात नेण्यात आलं होतं. मात्र आज  सायंकाळी ५ वाजता दिवशी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने केवळ मध्यप्रदेशातच नव्हे तर देश विदेशातील शायरी विश्वात दुःखाची लाट पसरली आहे. त्यांना विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे . मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे .

आज सकाळी त्यांनी स्वतः करोनाची लागण झाल्याने इस्पितळात भरती झाल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘करोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर काल करोनाची चाचणी केली. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी ऑरबिंदो इस्पितळात भरती झालो. मी या आजाराला हरवेन अशी प्रार्थना करा.’ दरम्यान यासोबत कोणीही घरच्यांना किंवा त्यांना फोन न करण्याचीही विनंती केली होती. अरबिंदो इस्पितळातील डॉक्टर विनोद भंडारी यांनी सांगितले की, ‘राहत इंदौरी आधीपासून अनेक आजारांनी ग्रस्त होते. त्यांना मधुमेहाचा आणि हृदयाचा आजार होता. दोनदा हृदयविकाराचे झटका आला. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. डॉक्टर पुढे म्हणाले की, त्यांना ६० टक्के निमोनिया होता. याशिवाय त्यांचं ७० टक्के यकृत खराब होतं, करोना पॉझिटिव्ह होते, हायपर टेन्शन आणि मधुमेहाचाही त्रास होता.’ प्रारंभी राहत इंदौरी यांना रविवारी  इंदूरमधील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा कोविड रिपोर्ट आल्यानंतर त्यांना अरबिंदो इस्पितळात भरती करण्या आलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!