Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील तिसऱ्या मंत्र्यालाही कोरोना, राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवरही मारली कोरोनाने धडक

Spread the love

महाविकास आघाडीच्या तिसऱ्या मंत्र्यांसह त्यांच्या स्टाफमधील ५ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये  त्यांचा स्वीयसहायक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि वाहनचालक अशा पाच जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही  कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे मंत्री सहभागी झाले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपर्कात आलेल्या मंत्र्यांसह अन्य लोकांनाही 28 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचं आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलं आहे.

मराठवाडा दौऱ्यानंतर हे मंत्री महोदय मुंबईत आल्यानंतर त्यांची  आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट काल रात्री आले. यात या मंत्री महोदयांसह त्यांच्या स्टाफमधील पाच जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही कोरोनाची लक्षणं आढळून आली नव्हती.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये करोनाचा संसर्ग झालेले  हे तिसरे मंत्री आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते करोनामुक्त झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची बाधा झाली होती. तेही करोनामुक्त झाले आहेत.

राज ठाकरे यांचे मनसैनिकांनी पत्र 

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही  कोरोनाची लागण झाली आहे . दरम्यान  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस असतो. पण राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.

लॉकडाऊन नंतरही राज्यात रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत असून काल  गुरुवारी राज्यात 3607 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 648 म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर गुरुवारी 152 नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 3590वर गेला आहे. आज 1561 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात 46078 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!