Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : अस्तित्वातच नसलेली जमीन १ कोटी ३८ ला संगनमताने विकली आणि गुन्हा रद्द करा म्हणून खंडपीठात आले…. !!

Spread the love

आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा  अशा आशयाची आरोपींनी दाखल केलेली याचिका मुंबईत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने  फेटाळून तर लावलीच शिवाय या प्रकरणात कसून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला अस्तित्वात नसलेली जमीन तब्ब्ल १ कोटी ३८ लाख ७३ हजार १५० रुपयांना विकून फसवणूक केल्याबाबतची हि मूळ फिर्याद आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि , पुणे येथील व्यापारी तथा  उद्योजक अमित नवनीत गांधी यांनी  2012 रोजी गुन्हा दाखल केलेल्या खाजगी तक्रारी अन्वये लोहारा पोलीस स्टेशन,  तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद येथे फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.  सदर तक्रारींमध्ये मौजे बेलवाडी येथील सुमारे 42  रहिवासी व्यक्तींसह  तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे संगनमत करून मुळातच अस्तित्वात नसलेली जमीन खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखताने तब्बल 1 कोटी 38 लाख 73 हजार 150 रुपयात विकून गांधी यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

सदर तक्रारदार हे पुण्यातील नामवंत व्यावसायिक असून सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी सबंध, एक सलग व वाटणी हिस्से न झालेल्या जमिनीच्या शोधात असताना गावातील तथाकथित नामवंत व्यक्ती त्यांची ओळख झाली व त्यातून झालेला गैरव्यवहार विरुद्ध खोटी व बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक व इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.  सदर तक्रारीत तत्कालीन तहसीलदार शशिकांत बिभीषण गायकवाड व तत्कालीन महसूल मंडलाधिकारी तथा मंडल निरीक्षक गोपाळ तुळशीराम अकोस्कर यांनी बेकायदेशीररित्या बनावट व खोटी महसूल कागदपत्रे व अभिलेख तयार करून गुन्हा घडविण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला गेला आहे.

सदरील दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे तत्कालीन तहसीलदार व महसूल मंडलाधिकारी तथा  मंडल निरीक्षक यांनी फौजदारी अर्ज दाखल करून सदर गुन्हा रद्द करण्याची विनंती केली होती त्यात माननीय न्यायालयाने कसून तपास करण्याची गरज आहे असे निरीक्षण करून सदर अर्ज करण्याचे आदेश पारित केले. या प्रकरणात  ऍड. शंतनू  देशपांडे जिंतुरकर यांनी फिर्यादी तर्फे तर अर्जदाराने तर्फे वसंत साळुंके , सरकारतर्फे  एस. बी. नरवडे यांनी बाजू मांडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!