कोरोनाच्या काळातही ४० हजाराची लाच घेणाऱ्या एसीपीविरुद्ध गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

वातावरण कोरोनाचे असो कि कशाचेही असो , लाचखोर पोलिसांना काहीही फरक पडत नाही . अशा लोकांना भ्रष्टाचाराचे व्यसनच लागलेले असते . बऱ्याचदा अशा लोकांना तक्रारीची सुद्धा भीती वाटत नाही. अशाच एका प्रकरणात  पुणे शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून नेमणुकीस  असणारे दीपक हुंबरे या अधिकाऱ्याने कोरोनाच्या काळातही गुन्ह्यात न अडकविण्यासाठी आरोपीकडूनच ४० हजाराची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला असून विशेष म्हणजे,  दीपक हुंबरे हा सक्तीच्या रजेवर होता. तरीही हुंबरे पोलीस गणवेशात सातारा जिल्ह्यात गेला आणि त्याने गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ४० हजार रुपयांची खंडणी घेऊन पुण्यात आला.

Advertisements

या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.  फिर्यादी तरुण भुईंज शहरातील रहिवाशी असून तो व्यावसायिक आहे. १५ दिवसांपूर्वी त्याने भुईंज परिसरात गोळीबार केला होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, तो फरार झाल्यामुळे त्याच्या मित्राकडे चौकशी सुरू होती. या गोळीबार प्रकरणात आरोपींना पोलीस मारहाण करणार नाहीत, असं परस्पर सांगून हुंबरे याने ४० हजार रूपये घेतले होते. वास्तविक या खंडणीसाठी ५० हजारांची बोलणी झाली होती. त्यापैकी हुंबरे याने ४० हजार रुपये घेतले होते. यापूर्वीही हुंबरे साताऱ्यात नियुक्तीला असताना त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने पैसे घेताना रंगेहाथ अटक केली होती. हुंबरे हे लाचखोरी करण्याबाबत कुख्यात म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हुंबरेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी प्रकरणाचा अहवाल शासनास सादर केला असून लवकरच निलंबनाची कारवाई अपेक्षित असल्याची माहिती  वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार