Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaLatestUpdate Live : कोरोनामुळे मुंबईत पोलिसाचा मृत्यू, एका क्लिकवर जाणून घ्या Covid-19 ची ताजी स्थिती…

Spread the love

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील तीन महिला रुग्णांची (वय 18, 26 आणि 31) तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) टाऊन हॉल परिसरातील 70 वर्षीय पुरुष आणि किलेअर्क मधील 60 वर्षीय महिला अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांची आज भर पडली आहे.

मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या ५७ वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला सल्याचे वृत्त आहे. बृहन्मुंबई पोलिसांनी हि माहिती दिली आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी रुग्णवाढीचा दर मंदावल्याचे  चित्र आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवार सकाळपासूनच्या २४ तासात देशभरात १४२९ रुग्ण वाढले. ही वाढ गेल्या अनेक दिवसांतली कमी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाने ७७९ बळी घेतले आहेत. देशात सध्या कोरोनारुग्णांची संख्या २४,९९२ झाली आहे.

COVID-19 च्या चाचणीचे  प्रमाण वाढल्यानंतरही भारतात कोरोनाचे रुग्ण आवाक्याबाहेर वाढलेले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. आज मंत्रिमंडळाच्या गटाची बैठक झाली. त्यामध्ये भारतातल्या कोरोनाव्हायरच्या साथीबद्दल चर्चा झाली. देशात सध्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण ३.१ % आहे. हा मृत्यूदर इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे. हीसुद्धा इतर युरोपीय देशांच्या तुलनेत चांगलं असल्याचं मंत्रिगटाच्या बैठकीत सांगितलं गेलं.

आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ९.१ दिवस आहे आणि तो हळूहळू वाढतो आहे. कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचं हे चिन्ह मानलं जातं. देशात शुक्रवारनंतरच्या २४  तासात कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण ६ टक्के राहिले असून ही वाढ गेल्या कित्येक दिवसातली कमी वाढ आहे. पहिल्या १०० रुग्णांनंतर हा रुग्णवाढीचा वेग वाढत होता. तो आता पहिल्यांदाच कमी होतो आहे. देशात मुबलक प्रमाणात मास्क आणि आरोग्यसेवकांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आजच्या तारखेला देशात दररोज १ लाख PPE किट्स आणि N95 मास्क तयार होत आहेत. देशभरात १०४ उत्पादकांकडून या किट्स बनवल्या जात आहेत, असं मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं.

यवतमाळ तीन दिवस बंद , कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३० वर 

यवतमाळ : यवतमाळ मध्ये एकाच भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने यवतमाळ शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी दिले आहेत. रुग्णालये, औषधी दुकाने आणि दुधाची दुकाने वगळता किराणा आणि भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी तीन दिवस विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, असं आवाहन देवेंद्रसिंह यांनी केलं आहे.

यवतमाळमध्ये आज आणखी १५ करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे. हे सर्व व्यक्ति, भरती असलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आले होते. तसेच त्यांच्या तीन कुटुंबातील सदस्यांचा यात समावेश आहे.


Maharashtra Total : 6817 । Discharge : 840 । Death : 301

India Total : 24506 । Discharge : 5063 । Death : 775

World Total : 28,31,915 । Discharge : 08,07,037 । Death : 1,97,318


नवी दिल्ली: केंद्राच्या आदेशात रेस्टॉरन्ट्सही उघडण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. याशिवाय केशकर्तनालये ही सेवा प्रकारात येतात. केंद्र सरकारने केवळ सामान विकणाऱ्या दुकानांनाच सुरू करण्याची परवानगी दिली आहे. न्हाव्यांची दुकाने किंवा केशकर्तनालये सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नाही. दारूची दुकाने उघडण्याचाही सरकारचा कोणताही आदेश नाही- पुण्यसलिला श्रीवास्तव, संयुक्त सचिव, केंद्रीय गृह मंत्रालय

दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये आढळले १३८ करोना रुग्ण. दिल्लीत एकूण करोना रुग्णांची संख्या २,५१४. दिल्लीत सर्वात स्वस्त कोरोना टेस्ट किट. केवळ ८०० रुपयांत होणार कोरोना चाचणी.

उत्तर प्रदेश: संत कबीरनगरात एकाच कटुंबातील १९ जणांना करोना विषाणूची लागण.

हिंगोली : हिंगोली शहरातील राज्य राखीव दलाच्या जवानाला करोना; संपूर्ण गाव केलं सील

औरंगाबाद : एकाच कुटुंबातील तीन पॉझिटिव्ह , एकूण रुग्णांची संख्या ४७

औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील तीन महिला रुग्णांची (वय १८, २६ आणि ३१) भर पडली आहे. सध्या मिनी घाटीत एकूण १८ कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत दोन अशा एकूण २० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

पुणे : पुण्यात ७२ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू. पर्वती भागात राहणारी ही व्यक्ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती. काल रात्रीपासुन पुणे जिल्ह्यात आणखी १७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळं पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ११२८ वर पोहचलीय तर मृतांचा आकडा ६८ वर पोहचलाय.

अमरावती : अमरावतीतील हैदरपुरा परिसरातील दोन जणांना करोनाची लागण झाली आहे. या दोघांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अमरावतीत आतापर्यंत एकूण १६ रुग्ण आढळले असून त्यातील ७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमरावतीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे यवतमाळमधील पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण १५वर पोहचली आहे. हा रुग्ण सुरवातीच्या ६ पॉझेटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आला होता आणि गत काही दिवसापासून संस्थात्मक विलागिकरणात भरती होता.

मुंबई : मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३५७ ने वाढली असून एकूण रुग्णसंख्या आता ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर  गेल्या २४ तासांत १२२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

मुंबईतील खासगी दवाखान्यांवरही कोविड कायद्यानुसार होणार कारवाई

नर्सिंग होम सुरू करा, अन्यथा परवाने रद्द करू; मुंबई पालिकेचा इशारा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ५५०वर; तर मृत्यू संख्या १७ वर

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १० वर पोहोचली असून आतापर्यंत 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4 जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!