Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : काय चालू आहेत पंतप्रधान मोदींच्या पुढील हालचाली ? जाणून घ्या….

Spread the love

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपायच्या आत ३० एप्रिलपर्यंत दुसरा टप्पा घोषित केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर केला. या शिवाय देशभरात कोरोनाच्या स्थितीवरून तीन झोनची  निर्मितीही केली आणि कडक उपाययोजना जरी केल्या दरम्यान पुढील निर्णय घेण्यासाठी येत्या २७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी  पुन्हा एकदा देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा  करून  कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान लोकंडाऊननंतरही देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत  आहेत तर  महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. पंतप्रधानांनी याआधी ३ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करत काही ठिकाणी अटी शिथिल केल्या होत्या. २० एप्रिलनंतर निंर्बंध थोडेफोर शिथिल केले गेले.  ज्या परिसरात जास्त कोरोनाचे रुग्ण नाही, त्या भागाचे झोन तयार करून उद्योगांना अटीशर्थींवर सुरुवात करण्याची मुभा देण्यात आली होती. राज्य सरकारने ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन अशी विभागणी करून राज्यात व्यवहार सुरू केले आहे. यात  रेड झोनमधील जिल्ह्यात बंदी कायम आहे.

पंतप्रधान मोदी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर लॉकडाउनबाबत आणि कोरोना लढ्याबाबत पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याची शक्यता आहे.  पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, मोदींसोबतच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य विभागाचे सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी हजर राहायचे आहे. याआधीही पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर देशाला संबोधित करून निर्णय जाहीर केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!