Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : राज्यात रुग्णांची संख्या ३३२० तर २०१ जणांचा मृत्यू , ३३१ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

राज्यात आज ११८ रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची राज्यातील एकूण संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान आज ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजचे ३१ रुग्ण धरुन एकूण ३३१ करोना रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ज्या सात रुग्णांचा मृत्यू झाला त्यातले पाचजण मुंबईचे तर दोघेजण पुण्यातले आहेत.

आज झालेल्या सात मृत्यूंपैकी ५ पुरुष तर दोन महिला आहेत. आज झालेल्या सात मृत्यूंपैकी एक रुग्ण ६० वर्षांवरील होता. तर इतर ६ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील होते. मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी ५ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग या स्वरुपाचे आजार होते. करोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ६१ हजार ७४० रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५६ हजार ९६४ नमुने हे निगेटिव्ह आले आहेत. तर ३३२० रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत ३३१ करोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरं झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ७४ हजार ५८७ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. ६ हजार ३७६ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. अशीही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मालेगावात ६२ जणांना कोरोनाची लागण तर मृत्यूची संख्या ४
मालेगावात प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार नव्याने १४ जण करोनाबाधित आढळून आले  आहेत.  यामध्ये सकाळी मृत पावलेल्या एका वृध्द डॉक्टरचा तसेच १३ एप्रिल रोजी मृत पावलेल्या महिलेचा समावेश आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७० झाली आहे.

दरम्यान मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात गुरुवारी  सायंकाळी दाखल झालेल्या ८१ वर्षीय डॉक्टरांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी  सकाळी मृत्यू झाला. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल करोनाबााधित असल्याचा आला आहे. तसेच १३ एप्रिल रोजी मृत पावलेल्या महिलेचा प्राप्त झालेला अहवाल देखील सकारात्मक आला असून अन्य १२ जणांचे अहवालही सकारात्मक आले आहेत. या अहवालांमध्ये ११ जण आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत आणि या सर्वांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले आहे. मात्र तीन जण नव्या ठिकाणचे आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!