Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : धक्कादायक : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाने घेरले….

Spread the love

जगभर कोरोनाची दहशत वाढतच असून जगातील धक्कादायक बातमी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वृत्त आहे. त्यांनी  स्वतःच आज ट्विट करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांना करोनाची बाधा झाल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते.  गेल्या २४ तासांत आपली प्रकृती काहीशी खालावली असल्याचे जाणवले. करोनाची चाचणी केल्यानंतर करोनाची बाधा झाली असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले. जॉन्सन यांनी स्वत:ला विलग करून घेतले आहे. मात्र, सरकारचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारी पार पाडणार असून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या आधी बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यांनीही ट्विटरवरही माहिती दिली. करोनाची बाधा झाल्याचे समजताच त्यांनी स्वत:ला घरातच विलग ठेवले होते. त्यानंतर त्यांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्या नदीन डॉरिस ह्यांची प्रकृती चांगली असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ही हजेरी लावली. त्यावेळी सभागृहात त्यांचे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी स्वागत केले. दरम्यान, ब्रिटनमध्ये करोनाचा संसर्ग वाढत आहे. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटन सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. गुरुवारी ११८ जणांचा मृ्त्यू झाला. ब्रिटनमध्ये करोनामुळे ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २१२९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. ब्रिटनमध्ये ११ हजारहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!