CoronaVirus News Update : देशातील रुग्णांची संख्या ११० वर तर महाराष्ट्रात ३८, आरोग्य यंत्रणा सतर्क , अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध पुण्यात पहिला गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या ११० वर गेली असून कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने  देशभर उपाययोजना करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान दिल्लीतही या विषयावर मंत्रिपरिषदेची बैठक घेण्यात आली असून सर्व राज्याशी संपर्क साधण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद सुरू आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं चित्र असून  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यवतमाळमध्ये करोनाचा आणखी एक रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णांची संख्या आता  ३८ वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Advertisements

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असतानाही पुण्यामध्ये सोमवारी हा प्रकार घडला. या तरुणाविरोधात कोरोगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेज किंवा इतर फोटोही न तपासता फॉर्वड न करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

कोल्हापूरमध्ये झाला कोरोना संशयिताचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती १५ तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. सर्व चाचण्या झाल्यानंतर रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मृत्यूचं नेमकं कारण काय असावं याचा डॉक्टर शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे रक्ताचे नमुने टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले होते. आज अहवाल येणार होता. पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. खरंतर कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आजाराची लागण झाल्याच्या धक्क्यामुळे व्यक्तीचा जीव गेला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील असून कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं राहायची. ८ मार्च ते १५ मार्च संशयित रुग्णाने हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. त्यानंतर नागाव इथं परतल्यानंतर व्यक्तीला आजार सुरू झाला. कोरोना झाल्याची लक्षणं दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण अहवाल येण्याआधीच व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांनी व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला असून त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात पुण्यात असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. दरम्यान राज्यात कोरोना व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू होऊ शकते. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

अफवा न पसरवण्याचे आवाहन 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या देशात ११० वर पोहोचली असून  कोरोनाच्या वाढत्या संसर्गासोबतच अनेक अफवांनाही उधाण आलं आहे. कोरोनासंर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यात अशीच एक अफवा पसरवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहात असलेल्या परदेशातील काही पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा या तरुणानं दिली होती. या तरुणानं एका हेल्पलाईनवरून या संदर्भात माहिती दिली होती आणि सोशल मीडियावरही अफवा पसरवल्यानं या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान अफवांपासून सावध राहण्याचे आणि अफवा न पसरविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

आपलं सरकार