Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निर्भया अत्याचार प्रकरण : सर्व पर्याय संपले , पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, उद्या होणार फाशीच्या नव्या तारखेचा फैसला…

Spread the love

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावल्याने आता चारही आरोपींसमोरील सर्व पर्याय संपल्याने या चौघांनाही फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा त्यांची फाशी डेथ वॉरंट निघूनही त्यांच्या वकिलाने वेळकाढू धोरण अवलंबविल्यामुळे टळली होती.  सर्वप्रथम 22 जानेवारी, नंतर १ फेब्रुवारी आणि नंतर 3 मार्च अशा तीन वेळा तारखा ठरविण्यात आल्या होत्या परंतु प्रत्येक वेळी फाशी टळली . याप्रकरणी निर्भयाच्या आईसह देशातील अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु आता मात्र त्यांच्यासमोरील सर्व पर्याय संपले आहेत. दरम्यान नवीन डेथ वॉरंट देण्यासंदर्भात न्यायालयाने नोटिसा जरी केल्या असून उद्या दुपारी दोन वाजता याबाबत सुनावणी होत आहे.

बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जोशी पवन गुप्ता याची याचिका सुप्रीम कोर्टाने दोन मार्चलाच फेटाळली होती. आपल्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर  करावे अशी विनंती त्यांनी याचिकेतून कोर्टाकडे केली होती परंतु  पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्याची याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान त्याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने डेथ वॉरंट जरी करूनही ठरल्याप्रमाणे त्यांना ३  मार्चला फाशी देता आली नाही.

दरम्यान आता आज पवन गुप्ता यांची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे त्यामुळे चारही दोषींना फासावर लटकावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  मात्र न्यायालय नवे डेथ वॉरंट कधी जरी करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.  पवन गुप्ता याची दयायाचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पेंडिंग असल्याचे कारण दाखवून आरोपीचे वकील ए .एम . सिंह यांनी सदर फाशीला स्थगिती देण्याचा युक्तिवाद केला होता,  त्यावरून तिहार प्रशासनाने न्यायालयाला सांगितले होते की आता न्यायाधीशांची कोणतीही भूमिका नाही,  तुम्ही आगीशी खेळत आहात. राष्ट्रपतींचा निर्णय आल्यास आम्ही पुढील निर्णय घेऊ असेही न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना सुनावले होते त्यानुसार आता राष्ट्रपतींनी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळल्यामुळे या चारही आरोपींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!