Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Update : जाणून घ्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे निवेदन…

Spread the love

‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तर दिल्लीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी  करोना व्हायरसचा भारतातील शिरकाव, धोका आणि त्यासंबधीत उपयायोजना याबाबत माहिती दिली. भारतात आत्तापर्यंत एकूण २५ लोक करोनाबाधित आढळले आहे. यातील ३ जणांवर उपचार होऊन ते बरे झाले आहेत, अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

देशात दाखल होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानाच्या प्रवाशांची स्किनिंग सुरू आह. ईराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी तिथंच एक लॅब स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. छोट्या छोट्या सावधानतेनं करोनापासून वाचता येऊ शकतं, असं पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विधानपरिषदेत निवेदन 

दरम्यान करोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत असल्याने याबाबतच्या अफवांनाही वेग आला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात आज विधान परिषदेत यावरून निवेदन दिले. ‘करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत. राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. ‘करोना’च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत तीन ठिकाणी केंद्रं उभारण्यात आली आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

‘करोनाचं मूळ प्राणीजन्य पदार्थांमध्ये आहे. करोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण अडीच ते तीन टक्के आहे. लक्षणं ओळखून वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. हातरुमाल वापरणंही पुरेसं आहे. घाबरून जाण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. ‘एन-९५ हे मास्क फक्त रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. सर्वसामान्यांसाठी त्याची गरज नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती 

दिल्लीतल्या करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात जवळपास ६६ जण आले होते. याच रुग्णाच्या कुटुंबातील आग्र्यात असलेले ६ जण करोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं आढळलंय तसंच तेलंगणाच्या रुग्णाच्या संपर्कात जवळपास ८८ जण आले होते, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधले १६ जण करोनाबाधित आढळले आहेत. याच गटातील एका भारतीयालाही करोनाची लागण झालीय. या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये हलवण्यात आलंय, अशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

दिल्लीत करोना व्हायरस घुसल्याचं समोर आल्यनंतर जवळपास ७० जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. नोएडातल्या अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्यात. नोएडामध्ये ६ संशयित लोकांचे सॅम्पल घेण्यात आले होते. परंतु, त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. परंतु या सर्वांना पुढचे १४ दिवस विशेष देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. लक्षणं विकसित होताना दिसली तर त्यांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येईल. करोनामुळे दिल्ली, नोएडा भागातील नागरिक धास्तावले आहेत. त्यांना दिलासा देण्यास दिल्ली सरकारलाही डॉक्टरांची टीम मजबूत करण्यावर भर देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे करोना थोडाफार फैलावला गेला तर त्यामुळे जास्त अडचणी येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!