धक्कादायक : गुजरातच्या “या” महाविद्यालयाने उतरवली ६८ विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे !!

Advertisements
Advertisements
Spread the love

गुजराच्या भूजमधील  एका महाविद्यालयातील  मुलींना  मासिक पाळी आहे कि नाही ? हे  तपासण्यासाठी ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकारउघड झाला आहे.  यावरून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले. याबाबत  पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे. अहमदाबाद मिररने हे  वृत्त दिले आहे.

Advertisements

या वृत्तात म्हटले आहे कि , गुजरातच्या भूजमध्ये श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट नावाची एक एक संस्था चालवण्यात येते. २०१२ मध्ये या कॉलेजची सुरुवात करण्यात आली. २०१४ मध्ये या कॉलेजची नवी इमारत बांधण्यात आली. या महाविद्यालयात बी कॉम, बीए आणि बीएससीचे पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. प्रशासनाच्या नियमांनुसार जेव्हा मुलींची मासिक पाळी सुरु असते तेव्हा कॉलेजमधील धार्मिक स्थळ आणि हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात बंदी असते. अशा वेळी मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनींनी कुणालाही स्पर्शही करायचा नाही असेही या नियमात म्हटलं गेलं आहे. गुरुवारी हॉस्टेलच्या अधिक्षिका अंजलीबेन यांनी कॉलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर मुलींना वर्गातून बाहेर काढण्यात आले. कुणाची मासिक पाळी सुरु आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दोन मुलींनी हात वरती केले. त्यांना बाजूला काढण्यात आले. त्यानंतर ६८ मुलींना स्वच्छतागृहात नेण्यात आले. तिथे त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यात आली.

Advertisements
Advertisements

या महाविद्यालयाच्या  प्रशासनाला वाटले  की मुलींकडून मासिक पाळी संदर्भात घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन होतं आहे. त्यामुळे ही तपासणी करण्यात आली. गुरुवारी झालेल्या प्रकारानंतर ६८ मुलींनी आंदोलन केलं आणि संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा आहे त्यामुळे हे प्रकरण इथेच संपवा असे सांगितले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. मात्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे असंही या वृत्तात म्हटलं आहे.

Leave a Reply

आपलं सरकार