Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिक्षक भरतीच्या कार्यक्रमात जेंव्हा शरद पवारांनी वाचला ” शरद कमळ बघ ” चा धडा…

Spread the love

शिक्षक भारतीच्या अधिवेशनात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयावर कठोर टीका केली. एकीकडे फुले शाहू आंबेडकरणाचे नाव घयायचे आणि महाराष्ट्रात १३००० शाळा बंद करायच्या इतका चुकीचा व पुढच्या पिढीला उद्धवस्त करणारा निर्णय आम्ही कधीच घेतला नव्हता अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला ते म्हणाले कि , ” पाठ्यपुस्तक मंडळ सुरू झालं तेव्हा विज्ञानाचे आकर्षण नव्या पिढीला होईल, याची आम्ही काळजी घेतली. पण, अलिकडे पहिलीच्या मुलाला शिकवले जाते शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ!, असा चिमटा काढतानाच माझी आई स्कूल बोर्डात होती. सावित्रीबाई तिचा आदर्श. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या शिक्षक भारती अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार चिमटे काढले. यावेळी त्यांनी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरही टीका केली. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही लाल शाईत असते. मंत्र्यांची निळ्या शाईत असते आणि राज्यपालांची हिरव्या शाईत. आता आम्ही हिरव्या शाईचा फारसा विचार करत नाही, असा चिमटा काढतानाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हापासून मला लाल शाईची सवय आहे आणि त्यानुसार मी या यादीत टिक केली आहे, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले , यावेळी त्यांनी शिक्षक भारतीने मांडलेले सर्वच प्रश्न सोडवता येणार नसल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं. सर्वच प्रश्न काही सोडवता येणार नाहीत. शिक्षक भारतीचे कपिल पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बसून हे मुद्दे ठरवू. आमच्यात एकवाक्यता झाल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवू. हे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील. मी पाहतोय मुख्यमंत्र्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित होते. जसा पाच वर्ष तुम्ही संघर्ष केला. तसाच आम्हीही सत्तेत राहून संघर्ष केला. पाच वर्षात इतिहास बदलला, धडे बदलले मग आम्ही काय केले तर सरकार बदलले. धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!