प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई , मोठ्या शस्त्र साठ्यासह ५ दहशतवादी अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी जैश ए मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना श्रीनगरमधून अटक करून मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दहशतवादी घातपाताच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.

Advertisements

पोलिसांनी सांगितलं की, पकडलेले दहशतवादी हजरतबल इथं झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. काश्मीरमधून ३७० हटवल्यानंतर अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये घातपात करण्यासाठी हालचाली करत आहेत. मात्र सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळं दहशतवादी कारवायांना चाप बसला आहे.

Advertisements
Advertisements

या कारवाईबद्दल जम्मू काश्मीर पोलिसांनी म्हटलं आहे की, श्रीनगर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांना पकडल्यानं मोठं यश मिळालं आहे. पाचही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून ते प्रजासत्ताक दिनाच्या आधी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे एजाज अहमद, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारुख, नसीर अहमद मीर अशी आहेत.

आपलं सरकार