नवऱ्याला स्वयंपाक घरात पुरून “ती ” तिथेच तयार करीत होती जेवण…

Advertisements
Advertisements
Spread the love

मध्य प्रदेशात वकील पतीची निर्घृण हत्या करुन त्याच मृतदेह स्वयंपाकघरातच पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे स्वयंपाकघरात मृतदेह पुरुन त्यावर महिला जेवण करत होती. सदर महिलेने  हत्या केल्याचे  बिंग  फुटताच तिने पतीच्या कुटुंबियांवरच उलट आरोप केला. अखेर पोलिसांनी या पत्नीला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यात हि घटना घडली आहे.

Advertisements

याविषयी पोलिसांनी सांगितले कि , ३२  वर्षीय प्रमिलाने आपल्या वकील असलेल्या पतीची महेशची निर्घृण हत्या केली आणि  कुणाला या हत्येचा संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह स्वयंपाकघरातच  पुरला. पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीने स्वत: पोलिसात पती बेपत्ता  असल्याची तक्रार दिली. पतीच्या नातेवाईकांनाही  घरात येण्यावर या महिलेने मनाई केली होती.  मृताच्या भावाने या महिलेचे  हे पितळ उघडे पाडले आणि सदर महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

Advertisements
Advertisements

गेल्या महिन्यात २२ ऑक्टोबर रोजी आपला पती गायब आहे अशी तक्रार प्रमिलाने केली होती. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र २१ नोव्हेंबर रोजी अचानक पोलिसांसमोर एक खुलासा आला आणि संपूर्ण केसचा उलगडा झाला. संशयावरून मयताचा मोठा भाऊ अर्जुन बैनेवाल याने पोलिसांना घराचा तपास करण्याची विनंती केली. मला आणि आई-वडिलांना प्रमिला घरात येऊ देत  नाही. वारंवार घालून पाडून बोलते आणि दारातून हाकलवून देत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. भावाच्या बोलण्यात तथ्य असल्याचं लक्षात येताच अमरकंटक पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रमिलाच्या घरी पोहोचले. त्यांनी घऱाची झडती घेण्यास सुरुवात केली तेव्हा स्वयंपाघरातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी स्वयंपाकघर खोदन तेव्हा कुजलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह सापडला.

आपलं सरकार