Maharashtra Politics : सेनेला पाठिंबा हे अशोक चव्हाणांचे व्यक्तिगत मत, सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात घटनात्मक पेच : पृथ्वीराज चव्हाण

Advertisements
Advertisements
Spread the love

वर्तमान परिस्थितीत राज्यात कुणीच सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागणार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया  काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यपालांनीच धोरणात्मक निर्णय घेण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisements

राज्यात भाजपचा मुख्यमंत्री नकोच, असं सांगत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यावरही चव्हाण यांना विचारले  असता ते अशोक चव्हाणांचे  व्यक्तिगत मत असल्याचे  सांगत आपण आपले मत पक्ष श्रेष्ठींना कळविले असल्याचे सांगून त्यांनी  या प्रश्नावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.

Advertisements
Advertisements

दरम्यान राज्यातील सत्तापेचावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केलीय का? या प्रश्नावर त्यांनी होकारात्मक उत्तर दिलं. शरद पवार यांच्याशी आम्ही नेहमीच बोलत असतो. पण त्यांच्याशी काय चर्चा झाली, हे जाहीर सांगता येत नाही, असं सांगतानाच पवारच काय, आम्ही सर्वांशीच बोलत असतो, असंही ते म्हणाले.

राज्यातील सत्तापेचावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली. उद्या संध्याकाळपर्यंत राज्यात सत्ता स्थापनेचा दावा झाला पाहिजे. उद्या संध्याकाळपर्यंत कुणीच सत्तेचा दावा केला नाही तर राज्यपालांना राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागेल. राज्यपाल काय निर्णय घेतात, त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. पण महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज असल्याने राज्यपालांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा. त्यांनी सूत्रे हाती घ्यावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शिवसेनेने त्यांचे आमदार फुटू नयेत म्हणून आमदारांना अज्ञातस्थळी हलवले आहे. काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती आहे का? असा सवाल चव्हाण यांना करण्यात आला. त्यावर शिवसेनेने काय करावं आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र आमचा एकही आमदार फुटणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

आपलं सरकार