Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वंचितचा कुठे कुठे बसला काँग्रेस -राष्ट्रवादीला दणका ? आणि कुठे आहे दुसऱ्या स्थानांवर वंचित ?

Spread the love

वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या क्रमांकावरील जागा विजयी उमेदवार आणि मतांची आघाडी


  • बाळापूर : शिवसेना | ६९,३४३ | वंचित | ५०, ५५५ | १८, ७८८ | एमआयएममुळे ही जागा गमवावी लागली.

  • मुर्तीजापूर | भाजप | ५९, ५२७ | वंचित | ५७६१७ | १, ९१० | प्रतिभा अवचार

  • आकोट | भाजप | ४८, ५८६ | वंचित | ४१३२६ | ७, २६० फरक

  • वाशीम | भाजप | ६६, १५९ | वंचित | ५२४६४ | १३, ६९५ फरक

  • कळमनुरी | शिवसेना | ८२, ५१५ | वंचित | ६६१३७ | १६, ३७८ फरक

  • बुलढाणा | शिवसेना | ६७, ७८५ | वंचित | ४१७१० | २६, ०७५ फरक

  • लोहा | पिझंट वर्कर्स पार्टी | १, ०१, ६६८ | वंचित | ३७३०६ | ६४,३६२ फरक

  • सोलापूर | भाजप | ९६, ५२९ | वंचित | २३, ४६१ | ७३, ०६८ फरक

  • परभणी | शिवसेना |  १,०४, ५८४ | वंचित २२, ७९४ | ८१, ७९० फरक


महाराष्ट्र  विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचा दणका  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला असल्याची चर्चा केली जात आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी २० ते २५  जागांवर वंचितच्या प्रभावामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याचा आरोप केला जात आहे. जेंव्हा कि स्वतः काँग्रेसचे नेते स्वतःच या निवडणुकीत त्यांना मिळालेले यश हे अनपेक्षित यश असल्याचे सांगत आहेत तर्हीही त्यांचा दावा आहे कि त्यांच्या ३२ जागांवर वंचितांचा फटका बसला आहे.

अर्थात हि चर्चा आणि आरोप लोकसभेच्याही वेळी झळा होता तेंव्हा अतिशय आक्रमकपणे उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी आम्ही कुणाचे गुलाम नाहीत आणि आमचे कोणी मालक नाहीत असे प्रत्युत्तर दिले होते तरीही विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा काँग्रेसकडून तोच राग हलविण्यात येत आहे . मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या विषयावर प्रतीक्रिया देताना अतिशय सावध प्रतिक्रिया देत वंचित आघाडीने एम आय एम शी असलेली युती तोडल्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असेही म्हटले कि , भाजप -सेनेला त्यांची पराभूत करण्याची इच्छा होती पण तसे न होता त्यांचा फायदा भाजप -सेनेला अधिक झाला पण लोकशाहीत प्रत्येकाला उभे राहण्याचा हक्क आहे .

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे कि , राज्यातील जवळपास ३२ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.  वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

वंचितच्या दणक्याने बदलेले प्रमुख प्रभावी निकाल असे आहेत. 

१. चाळीसगावमध्ये भाजपच्या मंगेश चव्हाण यांना ८६ हजार ५१५ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख यांना ८२ हजार २२८  मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या राकेश जाधव यांना ३८ हजार ४२९  मते मिळाली.

२. बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना ६७ हजार ७८५ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना ३१ हजार ३१६  मते मिळाली. या ठिकाणी वंचितचे उमेदवार विजय शिंदे यांना तब्बल ४१ हजार ७१० मते मिळाली.

३. चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांना ९३ हजार ५१५  मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना ८६ हजार ७०५ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अशोक सुराडकर यांना या ठिकाणी ९ हजार ६६१ मते पडली.

४. सिंदखेड राजात राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ८१ हजार ७०१  मते पडली. तर शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांना ७२ हजार ७६३  मते पडली. वंचितच्या सविता मुंडे यांना ३९ हजार ८७५ मते पडली.

५. खामगाव मतदार संघात भाजपच्या आकाश फुंडकर यांना ९० हजार ७५७ मते मिळाली. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ७८९ मते मिळाली. वंचितचे उमेदवार शरद वसतकर यांना २५ हजार ९५७ मते मिळाली.

६. अकोटमध्ये भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांना ४८ हजार ५८६ मते मिळाली तर काँग्रेसच्या संजय बोडखे यांना २७ हजार ६७९ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांना ४१ हजार ३२६ मते मिळाली.

७. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या नितीनकुमार टाले यांना ६९ हजार ३४३ मते मिळाली. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार ५५५ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या संग्राम गावंडे यांना केवळ १६ हजार ४९७ मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान हाजी खान यांना ४४ हजार ३१३ मते मिळाली. एम आय एम – डॉ. रहमान खान ४४ हजार ५०७

८. अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२ मते मिळाली. राष्ट्रवादीचे साजीद खान यांना ७० हजार ६६९ मते मिळाली. तर वंचितच्या मदन भारगड यांना २० हजार ६८७ मते मिळाली.

९. अकोला पूर्वध्ये भाजपच्या रणधीर सावरकर यांना १ लाख ४७५ मते मिळाली. तर वंचितचे उमेदवार हरिदास भदे यांना ७५ हजार २६३ मते मिळाली. काँग्रेसच्या विवेक पारसकर यांना ९ हजार ५३३ मते मिळाली.*

१०. मुर्तीजापुरात भाजपच्या हरिश पिंपळे यांना ५९ हजार ५२७ मते मिळाली तर वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ५७ हजार ६१७ मते मिळाली. वंचितच्या उमेदवाराचा या ठिकाणी दोन हजारांहून कमी मताधिक्याने पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी ४१ हजार १५५ मते मिळाली.

११. वाशिममध्ये भाजपच्या लखन मलिक यांना ६६ हजार १५९ मते मिळाली तर वंचितच्या सिद्धार्थ देवळे यांना ५२ हजार ४६४ मते मिळाली. काँग्रेसच्या रजनी राठोड यांना ३० हजार ७१६ मते मिळाली.

१२. धामनगाव रेल्वेत भाजपच्या प्रताप अडसाड यांना ९० हजार ८३२ मते मिळाली. तर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांना ८१ हजार ३१३ मते मिळाली. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना २३ हजार ७७९ मते मिळाली.

१३. नागपूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या गिरीश पांडव यांना ८० हजार ३२६  मते मिळाली. भाजपच्या मोहन मते यांना ८४  हजार ३३९  मते मिळाली तर वंचितच्या रमेश पिसे यांना ५ हजार ५८३ मते मिळाली.

१४. बल्लाळपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ८६ हजार ००२ मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ७६२ मते मिळाली. वंचितच्या ३९ हजार ९५८ मते मिळाली.

१५. चिमुरमध्ये भाजपच्या बंटी भांगडिया यांना ८७ हजार १४६  मते मिळाली. काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना ७७ हजार ३९४  मते मिळाली तर वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४ हजार ४७४ मते मिळाली.

१६. राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईके यांना ९० हजार ८२३ मते मिळाली. काँग्रेसच्या वसंत पुरके यांना ८० हजार ९४८ मते तर वंचितच्या माधव कोहाले यांना १० हजार ७०५ मते मिळाली.

१७. यवतमाळमध्ये भाजपच्या मदन येरावार यांना ८० हजार ४२५ मते मिळाली. काँग्रेसच्या अनील मंगळुरकर यांना ७८ हजार १७२ मते मिळाली तर वंचितच्या योगश पारवेकर यांना ७ हजार ९३०  मते मिळाली.

१८. अर्णी मतदारसंघात भाजपच्या डॉ. संदीप धुर्वे यांना ८१ हजार ५९९ मते मिळाली. काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ४४६ मिळाली तर वंचितच्या निरंजन मसराम यांना १२ हजार ३०७ मते मिळाली.

१९. किनवटमध्ये भाजपच्या भीमराव केराम यांना ८९ हजार ६२८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव यांना ७६ हजार ३५६ मते मिळाली तर वंचितच्या प्रा. हेमराज उईके यांना ११ हजार ७६४ मते मिळाली.

२०. नांदेड उत्तर मधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना ६२ हजार ८८४ मते मिळाली. काँग्रेसच्या डीपी. सावंत यांनी ५० हजार ७७८ मते मिळाली तर वंचितच्या मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ५६९ मते मिळाली. एम आय एम फेरोज लाल ८१८९२ *

२१. जिंतूरमधून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना १ लाख १६ हजार ९१३ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना १ लाख १३ हजार १९६  मते मिळाली तर वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३ हजार १७२  मते मिळाली.

२२. फुलंब्रीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना १ लाख ६ हजार १९० मते मिळाली. काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ९१६ तर वंचितच्या जगन्नाथ रिठे यांना १५ हजार २५२ मते मिळाली.

२३. पैठणमध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना ८३ हजार ४०३ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोर्डे यांना ६८ हजार ९८७ मते तर वंचितच्या विजय चव्हाण यांना २० हजार ६५४ मते मिळाली.

२४. उल्हासनगमध्ये भाजपच्या कुमार आयलानी यांना ४३ हजार ६६६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना ४१ हजार ६६२ मते मिळाली तर वंचितच्या साजन सिंग यांना ५ हजार ६८९ मते मिळाली.

२५. चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर यांना ५३ हजार २६४ मते मिळाली. कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना ३४ हजार २४६ मते मिळाली तर वंचितच्या राजेंद्र माहुलकर यांना २३ हजार १७८ मते मिळाली.

२६. माळसिरस भाजप : राम सातपुते , १०३५०७ | राष्ट्रवादी कॉंग्रेस, उत्तमराव जाणकार : १००९१७ | वंचित ५५३८ | राजकुमार .

दरम्यान…

या उमेदवारांना मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना कुठलाही फटका बसला नाही. 

नांदेड दक्षिण, मोहनराव हंबर्डे । काँग्रेस । ४६९४३ । शिवसेना ३७०६६ ।  वंचित २६७१३ ।  एम आय एम २०१२२

कॉंग्रेसचे नितीन राऊत यांना नागपूर उत्तरमध्ये ८६ हजार ८२१ मते मिळाली. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना ६६१२७ . बहुजन समाज पार्टी २३३३३ . एम आय एम ९३१८ . वंचित बहुजन ५५९९ . तरीही काँग्रेस विजयी.

धरावी . कॉंग्रेस वर्ष गायकवाड ५३९५४ . शिवसेना ४२१३० . एम आय एम १३०९९ . बसपा १८७० .

भोकर . अशोक चव्हाण. १४०५५९ . भाजप बापूसाहेब गोरठेकर ४३११४ . वंचित बहूजन १७८१३ .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!