Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महत्वाची सूचना : मध्य रेल्वेच्या कोयना, प्रगती एक्सप्रेससह “या ” ११ रेल्वेगाड्या धावणार नाहीत

Spread the love

मध्य रेल्वेने मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्र परिसरात तांत्रिक आणि दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा मार्ग दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोयना, प्रगतीसह नांदेड-पनवेल, मुंबई-हैदराबाद, बीजापूर-मुंबईसह इतर सहा रेल्वे गाड्यांनी प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागणार आहे.

कोयना एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात येणार असून, पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी ५ ते १४ ऑक्टोबर या काळात दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे. हैदराबाद, विशाखापट्टनम, नांदेड या गाड्याही पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर हैदराबाद-मुंबई, मुंबई-पंढरपूर पॅसेंजर, मुंबई-विजापूर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मंकी हिलजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे २६ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान हा लोहमार्ग बंद ठेवण्यात आला. होता. त्यानंतर आता पुन्हा या लोहमार्गावरील रेल्वेगाड्या १० दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!