Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तुमचं WhatsApp बदलतंय !! नको असलेले मेसेज डिलीट करणे होणार सोपे , ‘This message was deleted’ हे नोटिफिकेशन यात दिसणार नाही

Spread the love

सोशल मीडियावर  लोकप्रिय असलेल्या  WhatsApp मध्ये नवीन बदल होत आहेत. आता नवे व्हॉट्स अॅप डिसअॅपिअरिंग मेसेज फिचर येऊ घातले असले तरी हे फिचर एकाच वेळी सर्व मेसेजवर अप्लाय होणार असल्याने त्याच्या यशस्वीतेबाबत यूजर्सच्या मनात साशंकता आहे. हे फिचर व्हॉट्स अॅप स्नॅपचॅटप्रमाणे काम करणार आहे. म्हणजेच WhatsApp वरचे मेसेज आपल्याला हवे तेव्हा गायब करता येणार आहेत. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, यूजर आपला मेसेज एक्सपायर होण्याची वेळ म्हणजेच त्याची मुदत संपण्याची वेळही ठरवू शकतो, पण त्यासाठी पाच सेकंद किंवा एक तास असे दोनच पर्याय मिळणार आहेत.

WhatsApp मेसेज एक्सपायर होण्यासाठी ५ सेकंद किंवा १ तास अशी कोणतीही वेळ ठरवता येणार आहे. या फिचरची चाचणी सध्या केवळ ग्रुप मेसेजसाठी केली जात आहे. हे फिचर निवडल्यानंतर ते पाठवलेल्या सर्व मेसेजवर अप्लाय होणार. मेसेज डिसअॅपिअरिंग फिचरसाठी एक मेसेज सिलेक्ट करता येणार नाही, जेणेकरून तुमचा एकच मेसेज काही वेळानंतर गायब होईल आणि अन्य मेसेज नियमित मेसेजप्रमाणे पाठवू शकाल. WABetaInfo नुसार, एकदा मेसेज रिमूव्ह केला तर पूर्णपणे गायब होऊन जाईल. ग्रुप चॅटच्या मेसेजचं कुठलंच ट्रेस राहणार नाही. सध्या मेसेज डिलीट कराताना एक नोटिफिकेशन येतं, ज्यात ‘This message was deleted’लिहिलेलं असतं.

हे फिचर स्नॅपचॅटसारखं आहे, पण मेसेज गायब होण्याआधी स्क्रीन शॉट घेतल्यास नोटिफिकेशन मिळणार की नाही याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. डिसअॅपिअरिंग मेसेज फिचर प्रायव्हसी राखण्यासाठी एक चांगलं फिचर ठरू शकतं, पण यूजरला मेसेज रिमूव्ह करण्यासाठी केवळ पाच सेकंद आणि एक तास असे दोन पर्याय मिळणार आहेत. हे नवं फिचर सध्या अल्फा स्टेजमध्ये आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅपने या फिचरवर काम करणं सुरू केलं आहे. यूजर्सपर्यंत हे फिचर कधी पोहोचणार, याची कुठलीही वेळमर्यादा समोर आलेली नाही.

या जुन्या सिस्टमवर चालणाऱ्या डिव्हाइसवर नवीन व्हॉट्सअॅफ अकाउंट क्रिएट होऊ शकणार नाही, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे. तसेच विद्यमान अकाउंट व्हेरिफाय देखील होऊ शकणार नाही, अशीही माहिती WABetaInfo ने दिली आहे. मात्र, अगोदारपासून व्हॉट्सअॅप इन्स्टॉल असेल तर मात्र ते काम करू शकणार आहे.

>> अँड्रॉइड व्हर्जन २.३.७ किंवा या पेक्षा जुने ( १ फेब्रुवारी, २०२० पर्यंत)

>> आयओएस ८ किंवा या पेक्षा जुने व्हर्जन ( १ फेब्रुवारी २०२० पर्यंत)

विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टम देखील ३१ डिसेंबर, २०१९ नंतर काम करणे बंद करणार आहे. या बरोबरच व्हॉट्सअॅप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरूनही हटवण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!