Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार… – राज ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा पार पडला यावेळी काही पक्षप्रवेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला आपण पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

राज ठाकरे यांच्या उपस्थित आज एमआयजीमध्ये पार पडलेल्या मेळाव्यामध्ये काही नेत्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यामध्ये धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्याबरोबरच नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी ही मनसेमध्ये प्रवेश केला आहे. पक्षामध्ये प्रवेश केलेले नेते निवडणूक लढवणार असल्याचे राज यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलं. अशाच पद्धतीने रोज चार-पाच नावं जाहीर करेन असं मिश्किल भाष्यही यावेळी त्यांनी केलं. दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी पहिल्या प्रचारसभेची जागा अद्याप ठरली नसल्याचं सांगताना लवकरच कळवू अशी माहिती दिली. प्रचार सुरु झाल्यावर जे काही सांगायचं ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगेन असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांना एका पत्रकाराने ‘ब्लू फिल्मसंदर्भात…’ अशी प्रश्नाला सुरुवात केली. या पत्रकाराला राज ठाकरे यांनी लगेचच ‘मी ब्लू फिल्म नाही करत आहे,’ असे उत्तर दिले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला आणि राज यांनाही हसू थांबवता आले नाही. ‘नाही मला ब्लू प्रिंट म्हणायचं होतं,’ असं नंतर तो पत्रकार म्हणाला. यावर राज यांनी ‘असं सगळ्या कॅमेरांसमोर विचारणं बरं दिसत नाही,’ असा टोलाही लगावला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. मनसे किती जागा लढवणार त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!