Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी घोषित , थोरात , चव्हाण , हंडोरे, नितीन राऊत, प्रणिती शिंदे आदींचा समावेश

Spread the love

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ५१ उमेदवार घोषित करण्यात आले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, लातूर शहरमधून अमित देशमुख, सोलापूर शहर मध्यमधून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, तर काँग्रेसचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी येथून निवडणूक रिंगणात असणार आहेत.

मुंबईतील भांडूप पश्चिम मतदारसंघातून सुरेश कोपरकर, अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव, चांदिवलीमधून मोहम्मद आरिफ खान, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे, वांद्रे पूर्वमधून झिशन सिद्दीकी, धारावीमधून वर्षा गायकवाड, सायन कोळीवाडातून गणेश यादव, मुंबादेवीमधून अमिन पटेल, कुलाबामधून अशोक जगताप यांना तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून रोहित साळवे, मीरा भाईंदरमधून सय्यद हुसैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातील पुरंदरमधून संजय जगताप, कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून माजी मंत्री रमेश बागवे, भोर येथून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातील विद्यमान आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमधून शिरीष चौधरी, नागपूर पूर्वमधून डॉ. नितीन राऊत, वरोरामधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस मतदारसंघातून विद्यमान आमदार विश्वजित कदम, जतमधून विक्रम सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज जाहीर केलेल्या ५१ उमेदवारांच्या यादीत २० विद्यमान आमदारांना संधी दिली असून, आघाडीची एकत्रित घोषणा होण्यापूवीर्च काँग्रेसने राज्यातील उमेदवारांची यादी घोषित केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!