Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Social Media : WhatsApp युजर्ससाठी महत्वाची बातमी , काय बदल होताहेत हे लक्षात घ्या….

Spread the love

सोशल मीडिया लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने काही बदल करण्याचे निश्चित केले असून या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप काही अँड्रॉइड आणि आयएसओ डिव्हाइससाठी आपला सपोर्ट संपुष्टात आणणार आहे. आता काही स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअॅपची नवे अपडेट मिळणार नाहीत, असे व्हॉट्सअॅपने प्रसिद्द केलेल्या माहितीत म्हटले आहे.

WABetaInfo ने या संदर्भात एक ट्विट केले असून त्यात  आयएसओ ८ या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या आयफोन्सवर आता व्हॉट्सअॅफ चालणार नाही, असे म्हटले आहे. हेच अँड्रॉइड २.३.७ आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोनलाही लागू होणार आहे. या सिस्टमसाठी ही सेवा १ फेब्रुवारी २०२० पर्यंत बंद होणार आहे.

ज्या सिस्टमसाठी व्हॉट्सअॅप बंद होणार आहे, अशा सिस्टममध्ये व्हॉट्सअॅप इंस्टॉल असेल तर ते चालणार आहे. मात्र एकदा का हे अनइन्स्टॉल केले तर मग पुन्हा सुरू होणार नाही, हे महत्त्वाचे. आयओएससाठीची मुदत आहे १ फेब्रुवारी, २०२०, तर विंडोज फोनसाठीची मुदत आहे ३१ डिसेंबर, २०२०. म्हणून या सिस्टम वापरत असलेल्या युजरनी व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करू नका.

या जुन्या सिस्टमवर चालणाऱ्या डिव्हाइसवर नवीन व्हॉट्सअॅफ अकाउंट क्रिएट होऊ शकणार नाही, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे. तसेच विद्यमान अकाउंट व्हेरिफाय देखील होऊ शकणार नाही, अशीही माहिती WABetaInfo ने दिली आहे. मात्र, अगोदारपासून व्हॉट्सअॅप इन्स्टॉल असेल तर मात्र ते काम करू शकणार आहे.

>> अँड्रॉइड व्हर्जन २.३.७ किंवा या पेक्षा जुने ( १ फेब्रुवारी, २०२० पर्यंत)

>> आयओएस ८ किंवा या पेक्षा जुने व्हर्जन ( १ फेब्रुवारी २०२० पर्यंत

विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टम देखील ३१ डिसेंबर, २०१९ नंतर काम करणे बंद करणार आहे. या बरोबरच व्हॉट्सअॅप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरूनही हटवण्यात येणार आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!