Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोण आणि का करते आहे आमदार प्रणिती शिंदे यांना टॉर्चर ? काय आहे कारण ?

Spread the love

सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधिला हे सरकार मेंटली टॉर्चर करत आहे, असा घाणाघाती आरोप काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. याबद्दल त्यांनी म्हटले आहे कि , सोलापुरातील शासकीय रुग्णालयात औषधाच्या  दरा संदर्भात आम्ही आंदोलन केले होते. त्यावर माझासह कॉंग्रेस कार्यकर्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र  माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी गोरगरीबासाठी नेहमी लढा देणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.  प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला आहे.


याबाबत माहिती अशी आहे कि , सरकारी  कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि कॉग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी बझार पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. प्रणिती शिंदे यांना अंतरिम जामीन मंजूर करत कोर्टाने त्यांना तीन दिवस म्हणजे १६ ते १८ सप्टेंबरपर्यत बझार पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करून प्रणिती शिंदे यांनी चौकशीसाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह सदर बझार पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली.

२ जानेवारी २०१८ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालय येथे नियोजन मंडळयाचा बैठकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख येत असताना आमदार प्रणिती शिंदे व कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना घेरावा घातला होता. त्यामुळे सरकार कामात अडथळा केल्याप्रकरणी प्रणिती शिंदे व कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूर कोर्टात ही खटला सुरू असताना आमदार प्रणिती शिंदे सुनावणीला हजर न राहिल्याने यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यानंतर शिंदे कोर्टात हजर राहिल्याने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करत कोर्टाने तीन दिवस म्हणजे १६ ते १८ सप्टेंबरपर्यत सदर बझार पोलिस ठाण्यात चौकशी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!