Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीचे आम आदमी पार्टीसोबत युतीचे संकेत , ‘एमआयएम’नंतर ‘आप’शी सकारात्मक चर्चा

Spread the love

‘एमआयएम’सोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर वंचितने ‘आम आदमी पक्षा’सोबत युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काही प्रमुख पदाधिकारी यांची ‘आम आदमी पक्षा’च्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक झाली. मुंबईतील दादरमधील आंबेडकर भवनात झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. आपकडूनही वंचितबरोबर जाण्याचे संकेत देण्यात आल्याने लवकरच राज्यात वंचित आणि आपचा नवा प्रयोग पाह्यला मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एमएमआयशी बोलणी सुरू राहिल. एमएमआयशी युती तुटलेली नाही, असं जरी वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलं असलं तरी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र वंचितबरोबर फारकत घेतल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं सांगत ओवेसी यांनी आघाडीत फूट पडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला केवळ ८ जागा दिल्याने नाराज झालेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी वंचितांशी काडीमोड घेऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु इम्तियाज यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून आमची युती ओवैसी यांच्याशी झाली असल्याने ते बोलत नाहीत तोपर्यंत एमआयएमशी आघाडी कायम राहील अशी आशा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली होती. दरम्यान वंचितला मुस्लिमांची मते मिळाली नसल्याचा जाहीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता त्यामुळे वंचितमधील मुस्लिम नेत्यांना शक्ती देण्याचे काम प्रकाश आंबेडकरांनी केले आहे इतकेच नव्हे तर मुस्लिम कार्यकर्त्यांना  थेट वंचित बहुजन आघाडीशी जोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!