‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म होतो आणि ब्राह्मणांमध्ये असंख्य सद्गुण असतात’ : न्यायमूर्ती चितंबरेश

Spread the love

केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. चितंबरेश यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म होतो. पूर्वजन्माच्या कर्मांच्या आधारे ब्राह्मणांचा दोनदा जन्म होतो आणि ब्राह्मणांमध्ये असंख्य सद्गुण असतात’, असे मत न्यायमूर्ती चितंबरेश यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना मांडले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे न्यायाधीश चितंबरेश यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisements

केरळच्या ब्राह्मण सभेने आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायाधीश चितंबरेश आपले म्हणणे मांडत होते. यावेळी त्यांनी आर्थिक आधारावरील आरक्षणाचे समर्थन केले. ब्राह्मणांना जात अथवा धर्म यांच्या आधारे आरक्षण न देता ते आर्थिक निकषांवर आधारित देण्यात यावे असे ते म्हणाले. सर्व ब्राह्मणांनी आरक्षणाचा आधार काय असला पाहिजे यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. आपण घटनात्मक पदावर असल्यामुळे यावर आपले मत मांडणे हे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही, मात्र अशी मागणी करण्यासाठी अनेक व्यासपीठं उपलब्ध आहेत याची मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, असेही चितंबरेश पुढे म्हणाले.

आपल्या भाषणात ते  पुढे म्हणाले की, ‘आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची व्यवस्था देशात करण्यात आली आहे. एखाद्या ब्राह्मण कुकचा मुलगा क्रिमी लेअरमध्ये येत असल्यास त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मात्र, एका लाकडाच्या व्यापाऱ्याचा मुलगा जो मागास वर्गात येतो, त्याला मात्र आरक्षणाचा फायदा नक्कीच मिळेल. हे पाहता तुम्ही पुढे आलं पाहिजे, कारण याबाबत आपला आवाज उठवण्याची हीच योग्य वेळ आहे.’

आपलं सरकार