Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुकेश अंबानीना ११ वर्षांपासून एक रूपयाही नाही पगारवाढ !! फिक्स पगाराचे पॅकेज तर पहा …

Spread the love

देशात सर्वत्र बेरोजगारीची चर्चा होत असताना सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची बातमी प्रसिद्ध झाली आहे. अंबानी यांनी म्हणे सलग ११ व्या वर्षी १५ कोटी रुपये वार्षिक वेतन घेण्याचा क्रम राखला आहे. कंपनीच्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कंपनीतील सहकाऱ्यांचा पगार २० कोटींच्या घरात गेला आहे.

फोर्बसच्या यादीत नेहमीच आघाडीचा क्रम राखणारे अंबानी हे देशातील निवडक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. अंबानी यांनी २००८-९ या वर्षापासून आपले वेतन, इतर लाभ, भत्ते आणि कमिशनपोटी १५ कोटी रुपये इतकीच रक्कम कायम ठेवली आहे. तत्पूर्वी त्यांचे वार्षिक वेतन २४ कोटी रुपये इतके होते.

मुकेश अंबानी यांचे जवळचे नातेवाईक आणि सहकारी निखील मेसवानी आणि हितल मेसवानी यांच्यासह अन्य पूर्णवेळ संचालकांना मोठी पगारवाढ देण्यात आली आहे. निखील आणि हितल मेसवानी यांचा वार्षिक पगार २० कोटी ५७ लाख झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या वेतनामध्ये चार कोटी ४९ लाख पगार भत्ता, ९ कोटी ५७ लाखांचे कमिशन आणि अन्य सुविधांसाठी २७ लाख रूपयांचा समावेश असल्याचे बैठकीत सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!