Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्यात पडून आठ वर्षीय चिमुकल्याचा करुण मृत्यू

Spread the love

ड्रेनेजच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात पडून आठ  वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी शहरातील CEM ह्या लष्करी हद्दीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रहिवासी क्षेत्रात ही घटना घडली आहे. CEM व्यवस्थापनाच्या हलगर्जी पणाचा हा बळी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे.

श्रीरंग जोशी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी (५ जुलै) दुपारीही ही घटना घडली. CME परिसरात ड्रेनेजसाठी खड्डे खोदले जात आहेत. त्यात पावसामुळे पाणी साचले आहे. तिकडे खेळण्यासाठी गेलेल्या श्रीरंगचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे. खड्डे खोदल्यानंतर त्या भोवती सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी का लावण्यात आली नव्हती. श्रीरंगला तिकडे जाण्यापासून का रोकल्या गेले नाही. याबाबत CME प्रशासनाकडून अद्याप कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान, शुक्रवारी भोसरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!