It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

PNB: नीरव मोदीच्या जामीन अर्जावर आज निर्णय, १३ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

Advertisements
Spread the love

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांची फसवणूक करणारा हिरे व्यापारी नीरव मोदीच्या जामीन अर्जावर बुधवारी सकाळी दहा वाजता निर्णय होणार आहे. लंडनच्या रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टीसमध्ये आज मंगळवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. यापूर्वी वेस्टमिनिस्टर कोर्टाने सतत तीन वेळा मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

नीरव मोदीला १९ मार्चला पीएनबी घोटाळ्याच्या आरोपाखाली स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान नीरव मोदीचे वकील क्लेअर मोंटगोमेरी यांनी नीरव आणि त्याच्या भावात झालेल्या संभाषणाचे मेल वाचले. त्यात साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेल्याचे पुरावे नाहीत, असा युक्तीवाद क्लेअर यांनी केला.

मोदी लंडनला पैसे गोळा करण्यासाठी आला होता. त्याला जामीन मिळाल्यास तो स्वत:ला एक इलेक्ट्रॉनिक उपकरणाने टॅग करेल, त्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रॅक होईल, असं वकील म्हणाले. मोदीविरोधात प्रत्यार्पणाचा खटला सुरू झाला आहे, त्यामुळे त्याच्या पलायनाचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवादही वकिलांनी केला.

Leave a Reply

विविधा