Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Malegaon Bomb Blast : साध्वी प्रज्ञा ठाकूर कोर्टात काय म्हणाल्या ?

Spread the love

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अखेर आज एनआयए विशेष कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने मालेगाव स्फोटाबाबत विचारणा केल्यानंतर मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाने मागील आठवड्यात या प्रकरणातील आरोपींना आज एनआयए कोर्टात मालेगाव स्फोटाची सुनावणी सुरू झाली. आतापर्यंत साक्षीदारांच्या साक्षीवरून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता, असे समोर आले आहे. यावर आपल्याला काही बोलायचे आहे का, असे कोर्टाने विचारले. यावर आपल्याला काही माहित नसल्याचे प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर कोर्टाने आतापर्यंत किती साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आली याची माहिती तुम्हाला तुमच्या वकिलाने दिली का, या प्रश्नावरही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

प्रकृती अस्वस्थाचे कारण देत गुरुवारी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कोर्टात हजर राहण्याचे टाळले होते. मात्र, त्याच दिवशी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राजपूत समाजाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वीच एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव प्रज्ञासिंह ठाकूर यांची जामिनावर सशर्त मुक्तता करण्यात आली आहे.

आजारी असूनही कोर्टात बसायला नीट जागा नाही. मला तासंतास असंच उभं राहावं लागलं, कोर्ट काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, त्यांना काय सांगणार?, असा त्रागा भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शुक्रवारी मुंबईत एनआयए कोर्टात केला. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए कोर्टातील सुनावणीसाठी साध्वी प्रज्ञासिंह मुंबईत आल्या होत्या. कोर्टात हजर होण्यासाठी साध्वींना उशीर झाल्या कोर्टाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर साध्वींना सलग चार तास कोर्टरुममध्ये उभ्या होत्या.

‘माझी तब्येत ठीक नसतानाही मला इथं बोलावलं गेलं, केवळ वकील बोलत आहेत. मग का बसवून ठेवलंय?’, असा संताप व्यक्त करत साध्वी यांनी कोर्टात ड्रामा केला. साध्वी भडकल्याने त्यांना शांत करण्यासाठी वकील सरसावले. कोर्टातील सुनावणी संपवल्यावर न्यायाधीश उठून गेल्यावर साध्वी यांनी हा ड्रामा सुरु केला होता.

माझ्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर मला फासावर लटकवा. पण जोवर माझ्याविरुद्ध आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपी म्हणून मला योग्य ते सर्व अधिकार मिळायला हवेत, असं साध्वी म्हणाल्या. प्रकृती ठीक नसल्याने बसण्यासाठी योग्य जागा मिळायला हवी होती. पण मोडकळीस आलेली खुर्ची दिली गेली, अशी नाराजी साध्वी यांनी वकिलांसमोर बोलून दाखवली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!