Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बारावीचा निकाल जाहीर , यंदाही मुलीच पहिल्या , एकूण निकाल ८५ टक्के

Spread the love

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी निकाल जाहीर झाला असून यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील. बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

बारावीच्या निकालातील गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रेण्ड कायम राहिला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
एकूण निकाल : 85.88 टक्के, मुली :  90.25 टक्के, मुले : 82.40 टक्के

राज्यभरातून बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. परीक्षेत १४ लाख २४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. यात मुलींची संख्या ६ लाख ३० हजार २५४ तर मुलांची संख्या ७ लाख ९१ हजार ६८२ इतकी होती. यातील १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे.

गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.

शाखानिहाय निकाल विज्ञान – ९२.६० (२०१९), ९५.८५ (२०१४),  कला – ७६.४५  (२०१९)  ७८.९३ (२०१४), वाणिज्य८८.२८ (२०१९), ८९.५०(२०१४), उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम- ७८.९३ (२०१९)  ८२.१८ (२०१४)

विभागवार निकाल
महाराष्ट्रात बारावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.

निकालाची एकूण टक्केवारी :

पुणे – ८७. ८८ टक्केनागपूर – ८२.५१ टक्के, औरंगाबाद – ८७.२९ टक्के, मुंबई – ८३. ८५ टक्के, कोल्हापूर- ८७.१२ टक्के, अमरावती- ८७.५५ टक्के, नाशिक- ८४.७७ टक्के, लातूर- ८६. ०८ टक्के, कोकण- ९२.२३ टक्के

मुंबईच्या सोफीया कॉलेजची विद्यार्थ्यिनी निशिका ही iPad वर परिक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली असून ती उत्तीर्ण झाली आहे. तिला ७३ टक्के मिळाले आहेत. यंदा पहिल्यांदाच २२ प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी होते.  दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२. ६० टक्के इतका लागला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!