Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यातील दलित , मराठा आमच्यासोबत यावेळी विधानसभेच्या २२० जागा मिळवू : मुख्यमंत्री

Spread the love

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून २२० जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला. मोदींच्या धोरणांवर विश्वास ठेवून देशातील मध्यमवर्गीयांबरोबरच द्रारिद्र्य रेषेखालील लोकांनीही भाजपाला मतदान केले. तसेच दलित आणि मराठा समाजातील बांधवही भाजपाबरोबरच असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या धोरणांचा फायदा जनतेपर्यंत पोहोचला आहे आणि आम्हाला मिळालेल्या मोठ्या विजयातून हे सिद्ध होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही विधानसभा निवडणुकीत नवा विक्रम प्रस्थापित करू याबाबत खात्री आहे. विधानसभा निवडणुकीत युतीला २२० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही त्यांनी नमूद केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. तरी भाजपाला १२२ जागांवर तर शिवसेनेला ६३ जागांवर यश मिळाले होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही प्रभाव दिसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!