Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रामभक्त पायल रोहोटगीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ? म्हणाली , राजाराम मोहन रॉय ” ब्रिटिशांचा चमचा …”

Spread the love

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1132959431224963073

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याकडे कोण काय बोलेल याचा नेम नाही मग साध्वी प्रज्ञा असो कि आणखी कुणी !! असेच एक वक्तव्य अभिनेत्री पायल रोहतगी हिने केले आहे . तसे ती नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत असते. आता तिने  सती प्रथेचं समर्थन करणारं ट्विट करत भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय यांना ‘ब्रिटिशांचा चमचा’ म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. राजा राममोहन रॉय यांनी भारतातील क्रूर आणि जाचक अशा सती प्रथेला मूठमाती देण्यासाठी मोठा लढा उभारला. इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका ट्विटर अकाउंटवर राजा राम मोहन रॉय यांचा फोटो शेअर करण्यात आला होता.

राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद पाडली असा त्यात उल्लेख आहे. पायलनं हा फोटो ट्विट करत लिहिलंय, ‘राजा राममोहन रॉय थोर समाजसुधारक वगैरे नव्हते. उलट ते ब्रिटीशांचे चमचे होते. ब्रिटीशांनी सती प्रथेला बदनाम करायला त्यांचा वापर केला. सती प्रथा आपल्या देशात कधीच बंधनकारक नव्हती, उलट मुघल शासकांनी हिंदू महिलांना वैश्याव्यवसायात ढकलू नये याकरिता हिंदू महिलांचे रक्षण करणारी ही सती प्रथा होती. सती जायचे किंवा नाही हे ठरवणे याचा पूर्ण अधिकार त्या महिलेला असायचा. भारतातील स्त्रीवाद्यांनो, सती प्रथा प्रतिगामी कधीच नव्हती’ असं तिनं लिहिलंय.

आपल्या ट्विट मध्ये तिने असेही म्हटले आहे कि मी इतर धर्माचा मी आदर करते पण मला माझ्या हिंदू असण्याचा आणि माझ्या रितीरिवाजाचा अभिमान वाटतो. आपल्या ट्विटर अकाउंटवर तिने स्वतःच्या नावापुढे पायल रोहतगीअँड टीम भक्त ऑफ भगवान राम असे लिहिले आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/986820743349465088

आपलं सरकार

Click to listen highlighted text!