प्रा. अनिल देशमुख यांचे अपघाती निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे अध्यक्ष मुंबईतील साठ्ये महाविद्यालायतील भौतिकशास्त्र विषयांचे प्राध्यापक अनिल देशमुख (वय ५१) यांचे आज सकाळी नंदुरबार जिल्यातील शहादा-खेतिया मार्गावर कारच्या अपघातात निधन झाले. मुलगा भार्गव व पत्नी उर्मिला आणि सासूबाई यांच्या सोबत ते सासुरवाडीस जात असताना हा अपघात झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Advertisements

या अपघातात त्यांच्या पत्नी ही जखमी झाल्या असून त्यांना शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. देशमुख हे जळगाव, पाचोरा तालुक्यातील हरेश्वर पिंपळगाव येथील आहेत. ते साठे महाविद्यालयात कार्यरत होते, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी आक्रमक असत. कनिष्ठ म्हविद्यालयीन शिक्षक संघटनाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. नुकतीच त्यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदावर निवड झाली होती. मुंबई शिक्षक मतदार संघांची निवडणूकही त्यांनी गतवर्षी लढवली होती. त्यांच्या अपघाती जाण्याने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार