Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी झाले आता शिवरायांचा मावळा , म्हणाले अतिरेक्यांना घरात घुसून मारू , तुम्ही मत काँग्रेसला नव्हे भाजपाला द्या

Spread the love

दहशतवादी हल्ले झाल्यानंतर काँग्रेसने या हल्ल्याचा बदला घेतला नाही. केवळ मंत्री बदलण्याचं काम केलं. आम्ही सत्तेत आल्यावर मंत्री बदलण्याची संस्कृती संपुष्टात आणत अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. अतिरेक्यांचा हल्ला खपवून घेणार नाही. अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारणारचं, अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर महायुतीच्या विजय संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा इशारा दिला. लोकसभा निवडणूक लागल्यानंतर नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील संयुक्त सभेत पहिल्यांदाच एकत्र आले. भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कसं काय मुंबई ? सर्व काही ठिक आहे ना? असं मराठीतून संबोधत मुंबईकरांना साद घातली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी देशाला प्रोत्साहित करत आली असल्याचं सांगितलं.

देशातील सर्व संस्था आणि यंत्रणांचा निवडणूक सर्व्हे आला आहे. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. भाजपला ३०० ते ४०० जागा मिळतील असा दावा केला जातोय. ४४ खासदार असलेल्या काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील असा अंदाजही या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचं सरकारच येणार असेल तर भाजपला मतदान करणं योग्य ठरेल की काँग्रेसला? असा सवाल करतानाच तुमचं मत वाया घालवू नका. काँग्रेसला मतदान करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. आमच्या लाटेमुळे काही लोक खूपच वैतागले आहेत, पहिल्यांदा मतदान करणारे मोदींच्या पाठीमागे का उभे आहेत, हेच त्यांना कळत नाही , असेही तेम्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!