Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रभूंच्या विमानातून आलेल्या संशयास्पद पेटीची चौकशी करा: काँग्रेस- राष्ट्रवादी

Spread the love

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानातून उतरवण्यात आलेल्या पेटीमध्ये १५ कोटींची कॅश नव्हे तर आंबे होते, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या पेटीवरून भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संगमनेरमधील सभेत बोलताना प्रभू यांचे नाव घेऊन थेट आरोप केला. प्रभू भलीमोठी पेटी घेऊन धुळ्यात आले होते. या पेटीत आंबे असल्याचे सांगण्यात आले असले तरी आम्हाला त्याबाबत संशय आहे. म्हणूनच याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. सुरेश प्रभू यांनीही व्हायरल व्हिडिओवरून केला जात असलेला दावा फेटाळून लावला. माझ्या खिशात पंधरा रुपयेही नाहीत तर १५ कोटींचा प्रश्न येतोच कुठून, असा प्रतिसवाल प्रभूंनी केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या पेटीवर संशय घेतला. प्रभू यांच्या धुळे दौऱ्यात विमानातून एक मोठी पांढरी पेटी काढून घाईघाईने गाडीत ठेवण्यात आली. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीतही अशीच संशयास्पद हालचाल झाली होती, असे नमूद करत भाजपचे नेते त्यांच्या विमानांमधून पेट्या भरून निवडणूक जिंकण्याची नक्की कोणती मशीन उमेदवारांना देत आहेत?, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. दरम्यान, सुरेश प्रभू यांच्या विमानातून उतरवण्यात आलेल्या पेटीत १५ कोटी रुपये असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!