Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” तो ” मतदार आला , ” त्याने ” मतदान केले आणि झाले १०० टक्के मतदान !!

Spread the love

आज  देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया चालू असताना देशातील मतदान संपता संपता  देशातील एका मतदान केंद्राची चर्चा झाली ती या केंद्रावरील १०० % मतदानामुळे !! देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी १२.४६ टक्के मतदान झालं. पण देशात चर्चा व्हावी असे एक मतदान केंद्र होते गुजरातमध्ये. हे  मतदान केंद्र  केवळ एकाच मतदारासाठी बनवण्यात आले होतं आणि तिथं मतदानही पार पडलं. आणि मतदानझाले१००%

हि वृत्त कथा आहे , गुजरातमधील जुनागडची .  भारतदास बापू हे गीर अभयारण्यातील एका प्राचीन मंदिराचे पुजारी आहेत. गीर जंगलातील दाणेज नामक गावात कोणालाही येण्याची परवानगी नाही. त्यामुळे इथे मंदिरात राहणाऱ्या या पुजाऱ्यासाठी येथे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं. येथील एका मतदारांसाठी  राखीव असलेल्या गीर अभयारण्यात भारतदास बापू नामक व्यक्तीसाठी हे वेगळे मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. आपल्यासाठी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची आणि मतदानाबाबतच्या कर्तव्याची जाण ठेवत त्यांनी केंद्रावर येऊन मतदानही केलं. मतदानानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बापू म्हणाले, सरकारने एका मतदानासाठी इथे मतदान केंद्र बनवले. त्यामुळे मी आवर्जून येत इथं मतदान केलं. त्यामुळे या केंद्रावर आता शंभर टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, त्यांनी देशवासीयांना आवाहन केले की त्यांनीही मतदानाचे कर्तव्य पार पाडायला हवे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!