Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याच्या धमकीने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात गुन्हा

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात, जिल्हा यवतमाळ , निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची बुधवारी सायंकाळी दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणात अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘आमची सत्ता आल्यास निवडणूक आयुक्ताला दोन दिवस जेलमध्ये टाकू’  निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची असून ते भाजपासाठी काम करतात असे विधान केले होते.

निवडणूक आयोग प्रचारात पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याचा उल्लेख करण्यास मनाई करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे विधान केले होते. या विधानाच्या अनुषंगाने दारव्हाच्या उपविभागीय निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अहवाल मागण्यात आला. त्यात हे विधान केल्याचे स्पष्ट असल्याने आंबेडकरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

निवडणूक विभागाच्या वतीने पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक जोशी यांनी यासंबंधी फिर्याद नोंदविली. त्यावरून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध भादंवि ५०३, ५०६, १८९ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती दारव्हाचे उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहीम चौधरी यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!