Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Current News Updates : गल्ली ते दिल्ली : मह्त्वाच्या बातम्या : एक नजर

Spread the love

1. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी गोपीचंद पडळकर यांना जाहीर. पक्षप्रवेशानंतर घोषणा

2. काँग्रेसचा बोफोर्स, तर भाजपाचा राफेल डीलमध्ये हात- मायावती

3. जम्मू-काश्मीरः पाकिस्तानकडून पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात ५ नागरिक जखमी, नागरिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवलं.

4. राजस्थानः सिरोहीमध्ये २ कोटी रुपये किमतीचं १० किलो सोनं नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

5. नागपूर: काँग्रेस उमेदवार नाना पटोले आणि जयदीप कवाडे यांच्याविरोधात भाजपने दाखल केली आचारसंहिता भंगाची तक्रार

6. जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

7. नागपूर: मी राजकीय संन्यास घेतला नाही, २०२४ ची निवडणूक लढवणार – उमा भारती, भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री

8. मावळ गोळीबार प्रकरणी कुठल्याही चौकशीत काहीही न आढळल्यास पंतप्रधानांना चुकीची माहिती पुरविणाऱ्या राज्यातील नेत्यांनी संन्यास घ्यावा; माझा काही हस्तक्षेप आढळल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन.अजित पवारांचे भाजप नेत्यांना आव्हान

9. नागपूर: भाजपच्या महिला मेळाव्यात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची उपस्थिती, नितीन गडकरी, सुलेखा कुंभारे, कांचन गडकरी आदींसह शेकडो महिलांची हजेरी

10. औरंगाबाद : संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या नऊ जागा लढवणार असून राज्यात इतर ठिकाणी युती व आघाडी शिवाय समविचारी, धर्मनिरपेक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार – ॲड. मनोज आखरे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष

11. अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत चोरट्यांचा डल्ला; चेन, मोबाईल रोख रक्कम लंपास, वीस जणांना चोरीचा फटका, दोन चोरटे पोलिसांनी पकडले

12. देशद्रोहाचा कायदा हा ब्रिटीशकालीन असून त्याची आवश्यकता नाही. भारतात, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसाठी युएपीए कायदा आहे. सध्या ब्रिटीशकालीन देशद्रोहाचे कलम राजकीय नेते आणि पत्रकारांविरोधात वापरले जाते : काँग्रेस

13. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ४ एप्रिल रोजी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार; प्रियंका गांधी-वाड्रादेखील राहणार उपस्थित

14. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर दहशतवाद आणि महागाई वाढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर सभेतील वक्तव्य

15. काँग्रेस सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा संपवणार असल्याचे जाहीरनाम्यात सांगत आहे. काँग्रेस भारतीय जवानांचे खच्चीकरण करत आहे का? – अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष

16. जालना नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश राऊत यांचा भाजपमध्ये प्रवेश

17. अहमदनगर: शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला

18. पंतप्रधान करणं देशातील जनतेचं काम आहे, पुढील पंतप्रधान जनताच ठरवेल: राहुल गांधी

19. नवी दिल्ली: ‘जन आवाज’…..लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

20. मेहसाना दंगल प्रकरणी हार्दिक पटेलनं दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

21. सोलापूर : वैराग खून खटल्यात 18 आरोपींना जन्मठेप, मयताच्या पत्नीला 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

आपलं सरकार

Click to listen highlighted text!