Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारताची विकासदराची आकडेवारी संशयास्पद : रघुराम राजन

Spread the love

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताची सात टक्के आर्थिक विकासदराची आकडेवारी संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीबाबतचा संशय दूर करण्यासाठी एका निष्पक्ष समूहाच्या नियुक्तीवर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशात रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. यामुळे सात टक्के आर्थिक विकासदराचा आकडा संशय निर्माण करणारा आहे. हा संशय दूर करण्याची आवश्यकता आहे, असं रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

सध्याच्या सांख्यिकी आकड्यांचा नेमका अंदाज लावणं अवघड आहे. देशाचा विकासदर समजण्यासाठी ही आकडेवारी सुधारण्याची गरज आहे. नोकऱ्याच नाहीत. तर मग सात टक्के विकासदर कसा गाठणार?, असं मोदी सरकारमधीलच एका मंत्र्याने आपल्याला सांगितलं होतं. यामुळे देशाचा विकासदर सात टक्क्याने होत नाहीए, असं राजन म्हणाले. पण राजन यांनी यावेळी संबंधित मंत्र्याचे नाव उघड केले नाही.

 

2 thoughts on “भारताची विकासदराची आकडेवारी संशयास्पद : रघुराम राजन

  1. सत्ता मिळवण्यासाठी कोणीही खर बोलण्यास तयार नाही. जनता एवढी सुशिक्षीत नाही की विचार करून मतदान करेल. आपल्या क्षेत्रात कसा उमेदवार उभा आहे याची जाणीव नसलेला मतदार असल्याने राजकीय पक्ष मतदारांना भावनिक करुन मतदान करण्यास उद्युक्त करतात. आज अशी परिस्थिती आहे की राष्ट्रापेक्षा व्यक्ती व पक्ष जनतेला मोठे वाटत आहे. सत्य जाणुन घेण्याची कोणत्याही नागरिकांची तयारी नाही.

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!