It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Manohar Parrikar: गोव्याचे मुख्यमंत्री  मनोहर पर्रिकर यांचे निधन

Spread the love

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर  यांचे निधन झाल्याचे वृत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटरवरून देण्यात आले आहे . त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती . त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली होती . मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त कळताच पर्रिकर यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Advertisements

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटरवरून ७.५८ वाजता हे ट्विट करण्यात आले. त्यांचे कार्य सर्वांच्याच सदैव आठवणीत राहील असे त्यांनी म्हटले आहे. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

साधं राहणीमान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशके आपला दबदबा राखला. वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात पर्रिकर यांनी मात्र आपल्या कुशल नेतृत्वाने ही अस्थिरता संपुष्टात आणली. मुख्यमंत्री म्हणून पर्रिकर यांनी गोव्याला यशस्वी नेतृत्व दिलं. गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा त्यांना बहुमान मिळाला. २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ ते निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता. त्यानंतर २०१४ मध्ये देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले. दरम्यान, २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपने पर्रिकर यांच्या नेतृत्वाची चाल खेळत राज्यातील सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.

आपलं सरकार