It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

लोकसभा २०१९ : औरंगाबादमधून “वंचित”चा उमेदवार नाही , एमआयएम आणि जनता दल ठरवतील : प्रकाश आंबेडकर

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

डॉ. प्रकाश आंबेडकर काॅंग्रेस – राष्ट्रवादीच्या महाआघाडीत का नाहीत?

Posted by BBC News Marathi on Friday, March 15, 2019

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांची उमेदवारी परभणीच्या जाहीर सभेत केली होती परंतु आज बीबीसीशी बोलताना न्या. कोळसेपाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाहीत तर जनता दल देवेगौडा यांचे उमेदवार असतील असा खुलासा करीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अंग काढून घेत या मतदार संघाचा बॉल ओवैसी आणि देवेगौडा यांच्या कोर्टात टाकला. याबाबत  ते चर्चा करून जो उमेदवार ठरवतील तो वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादचा उमेदवार असेल, आता या विषयावर मी बोलणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

या विषयी अधिक खुलासा करताना आंबेडकर म्हणाले कि, तीन महिन्यांपूर्वी  देवेगौडांनी मला फोन केला होता आणि औरंगाबादची सीट त्यांना पाहिजे होती . मी त्यांना विचारले कि , उमेदवार कोण आहे ? त्यांनी सांगितले कि , कोळसे पाटील . तेंव्हा आम्ही त्यांना हि सीट ग्रॅन्ट करून टाकली आणि सांगितले कि , आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार औरंगाबादेतून असणार नाही . आज तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही आणि येणारही नाही . ओवैसी, आमदार इम्तियाज, डॉ.गफार यांची आणि आमची बैठक नांदेड येथे झाली.याबैठकीतओवैसींनीयांनाविचारलेकि,तुम्हीलोकसभालढवणारआहेतका?म्हणजे मला इथे बोलता येईल त्यावर यांनी सांगितले कि, आम्हाला लोकसभा लढायची नाही. आम्ही विधानसभा लढवणार. मग मी त्यांना म्हटलं कि, जेवढ्या विधानसभा तुम्ही मागाल तेवढ्या विधानसभा मी तुम्हाला ग्रॅन्ट करतो . मी संख्याही विचारणार नाही . मग त्यांनी नांदेडच्या सभेमध्ये जाहीर केले कि एमआयएम लोकसभा लढणार नाही. आता असे दिसते आहे कि, इम्तियाज या ठिकाणी लढायला मागतात. आता त्यांनी लढायचे कि नाही ? हा निर्णय ओवैसीच घेणार आहेत.पण त्यावर तुमचे म्हणणे काय आहे ? तुम्ही ओवैसी यांच्याशी आघाडी केली आहे, तुम्ही जनता दलाला हि उमेदवारी दिली आहे. आणि आता जर इम्तियाज हि निवडणूक लढविणार असतील तर प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे काय असेल ?त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, मी आता या विषयावर बोलणार नाही. इम्तियाज यांनी याबाबत ओवैसी आणि देवेगौडा यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवावा, देवेगौडा ओवैसींचे चांगले मित्र आहेत. ते जो उमेदवार ठरवतील तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल.

Advertisements


Advertisements

औरंगाबादच्या जागेविषयी मोठा गुंता निर्माण झाला असून प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या सभेत औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार न्या. बी. जी. कोळसेपाटील असतील असे घोषित केले होते त्यानुसार स्वतः प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या मुंबईतील सभेत उपस्थितही होते त्यावेळी कधी ते जनता दलाचे उमेदवार असतील याचा खुलासा झाला नव्हता आता मात्र ते जनता दल देवेगौडा यांचे उमेदवार झाले असून याचा गुंता ओवेसी,  देवेगौडा , इम्तियाज आणि कोळसेपाटील यांनी सोडवावा आणि उमेदवार द्यावा असे म्हटले आहे. तोच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.