Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनसेचे शरद सोनवणे सेनेत तर संजय काकडेंनी कमळाची साथ सोडून धरला काँग्रेसचा हात

Spread the love

भाजपचे सहयोगी मित्र  खासदार संजय काकडे कमळाची साथ सोडून काँग्रेसचा हात धरून लोकसभेत जात आहेत तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनावणे राजठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन शिवसेनेची पायरी चढत असल्याने विविध पक्षातील आयाराम-गायरामांची धांदल सुरु झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’ निश्चित झाली आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदार शरद सोनवणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  मुंबईतील शिवसेना भवनात सोनवणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल.

शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. त्यामुळे मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कालच म्हणजे ९ मार्च रोजीच पक्षाचा १३ वा वर्धापन दिन साजरा केला. दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार संजय काकडे

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. स्वत: खासदार संजय काकडे यांनीच संदर्भात माहिती दिली. लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. पुण्यातील ‘पुणे कट्टा’वर बोलताना संजय काकडे ही माहिती दिली. पुणे लोकसभा लढवण्यासाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत, ते सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार पुणे कट्टावर एकत्र आले होते

आपलं सरकार

Click to listen highlighted text!