World cup 2019 : पावसामुळे बांगलादेश- श्रीलंका सामना रद्द

वर्ल्डकप स्पर्धेत ब्रिस्टॉल येथील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना आहे. ब्रिस्टॉल येथे सततच्या पावसामुळे श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात एकही षटकाचा खेळ होऊ शकला नाही.
या आधी सोमवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. तर ७ जूनचा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. श्रीलंकेच्या संघाला पावसामुळे दुसऱ्यांना फटका बसला आहे. चार सामन्यांच्या अखेरीस श्रीलंकेच्या खात्यात फक्त ४ गुण जमा झाले आहेत. तर बांगलादेश चार सामन्यांच्या अखेरीस ३ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
गेल्या काही दिवसांपासून ब्रिस्टॉल इथलं ढगाळ वातावरण पाहात यापुढेच्या सामन्यांवर टांगती तलवार आहे. अर्थात याचा फटका थेट संघांच्या गुणतालिकेतील स्थानावर होत आहे. यंदाचा वर्ल्डकप राउंड रॉबीन पद्धतीनुसार खेळविण्यात येत असल्याने स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी एकेक गुण प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा आहे.