News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

1. औरंगाबाद: नापास होण्याच्या धास्तीने आत्महत्या केलेली साक्षी झाली दहावीत पास.
2. सोलापूर : दहावी परीक्षेत नापास झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
3. यवतमाळ : दहावीत अनुत्तीर्ण झाल्याने जिल्ह्यातील एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
4. लखनौ – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचा रक्तदाब वाढला, राम मनोहर लोहिया वैद्यकीय रुग्णालयात दाखल
5. मुंबईत गडगडाटासह पावसाला सुरुवात; दादर, प्रभादेवी, परळ भागात सुरु झाला पाऊस.
6. पुणे: जोरदार आलेल्या पावसामुळे स्वारगेट एसटी स्थानकात पावसामुळे साचलं पाणी, पुण्यात संध्याकाळी दोन तासांत ३० मिलीमीटर पावसाची नोंद, वादळी वारा आणि पावसामुळे पुण्यात १५ ठिकाणी झाड पडल्याच्या घटना
7. नवी दिल्ली: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा.
8. आंध्रप्रदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं भगवान तरुपती बालाजीचं दर्शन, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीही होते उपस्थित
9. मुंबई: जून अखेरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील रिक्षा चालक-मालक ९ जुलैपासून संपावर जाणार
10. मुंबई: शिवडी येथे बेदरकार मारुती कार चालकाची बस थांब्याला धडक, ६ जण जखमी
11. अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथे गोरख सदू मते यांच्या गोठ्यातील बैलाचा अंगावर वीज पडून मृत्यू
12. औरंगाबाद: वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने झाड कोसळले
13. अलीगड हत्याकांडः साध्वी प्राची यांना पीडित मुलीच्या घरी जाण्यापासून पोलिसांनी रोखले.
14. ठाणेः मुंब्रा येथून पाचशे रुपयांच्या ११५ बनावट नोटा जप्त. आदिल अमजत मन्सुरीविरुध्द मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
15. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्टर संडे हल्ला झालेल्या परिसराला भेट दिली. श्रीलंकेवर झालेला दहशतवादी हल्ला हा भ्याड हल्ला होता, असे मोदी यांनी यावेळी म्हटले.
16. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथील चारा छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले.
17. पुणेः इंडिया हा शब्द राज्यघटनेतून काढून टाका. ‘इंडिया’ या शब्दाच्या जागी ‘भारत’ हा शब्द लिहाः स्वदेशी जागरण मंचाची मागणी.
18. पश्चिम बंगाल: भाजपा उद्या काळा दिवस पाळणार, राज्यपाल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
19. अकोला : अकोट फैल भागात शनिवारी रात्री दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जणांना अटक.
20. शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर मोठा हल्ला, पवारांच्या या वाकव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे !!