गुजरातमध्ये आहे असे एक गाव !! जेथे लग्नाविनाच स्त्री-पुरुष, पती-पत्नी सारखे राहतात आणि यथावकाश विवाह करतात !!

लग्न न करता, एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही शहरात फार सामान्य बाब मानली जाते. मात्र, गुजरात मधील साबरकांठा जिल्हातील पोशीना तालुक्यात राहणारे गमनाभाई आणि बंजरी देवी हे जोडपे जवळपास ५० वर्ष ‘लिव्ह इन’ मध्ये राहिल्यानंतर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला त्यांच्या मुलांसोबतच त्यांची नातवंडही उपस्थित होती.
गुजरातमधील डंगरू गरासिया भील आदिवासी समूहांमध्येही लग्न करण्याआधी ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्याला परवानगी आहे. तसेच, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना होणारी मुलांनाही या समाजात मान्यता मिळते. अशा प्रकारची लग्ने नेहमी या समाजात लावली जातात. महाराष्ट्र टाईम्स ने हे वृत्त दिले आहे.
या वृत्तात म्हटले आहे कि , डंगरू गरासिया भील या समाजात लग्नासाठी सार्वजनिक मेळे भरवले जातात. अश्याच एका मेळ्यात गमनाभाई आणि बंजरी देवी यांनी एकमेकांना पसंत केले आणि ते एकत्र राहू लागले, अशी माहिती गमनाभाई यांचा वडील मुलगा रंजित सोळंकी यांनी दिली. ‘लग्नासाठी जवळपास दीड ते दोन लाख रूपये खर्च येतो. आदिवासी मजूरी करून आपली पोटं भरतात. त्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची जमवाजमव होई पर्यंत जोडपी एकत्र राहतात. पैसे जमल्यावर सर्वांचे आदरातिथ्य आणि रितीरिवीज पद्धतशीरपणे करत जोडपी लग्न करतात’ असेही ते पुढे म्हणाले.