सोनाली कुलकर्णी झाली सलमान खानची आई , काय म्हणाली सोनाली पहा ….

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असणाऱ्या ‘भारत’ या चित्रपटात तर ती सलमान खानच्या आईची भूमिका साकारत आहे. भूमिका स्वीकारण्यापूर्वी आपण भूमिकेला पूर्णपणे न्याय देऊ शकू का, अशी शंका मनात आली असल्याचं सोनालीनं सांगितलंय. बॉलिवूड असो वा मराठी चित्रपट सृष्टी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाचं दर्शन करून देत असते.
सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘भारत’ या चित्रपटात सलमानच्या बांबांची भूमिका जॅकी श्रॉफ तर त्याच्या आईची भूमिका सोनाली साकारतेय. या भूमिकेबद्दल बोलताना सोनालीने ही भूमिका स्विकारण्यापूर्वीचा अनुभव शेअर केलाय.
या भूमिकेविषयी जेव्हा सोनालीला विचारण्यात आलं तेव्हा, आपण या भूमिकेला न्याय देऊ शकू का, अशी शंका सोनालीच्या मनात होती. मात्र, दिग्दर्शक अब्बास जफर यांनी सोनालीला आश्वस्त करत, या भूमिकेची गरज समजावून दिली. अब्बास यांच्या मते, या भूमिकेसाठी तरूण आणि प्रौढ दोन्हीही भूमिका हाताळू शकणाऱ्या अभिनेत्रीची गरज होती. त्यामुळे सलमानच्या आईची भूमिका सोनालीच साकारू शकेल असा विश्वास त्यांना होता.
ही भूमिका स्विकारण्यापूर्वी सोनालीने तिच्या वयाला ही भूमिका अनुरूप ठरते का, हाही विचार केला. पण सिनेसृष्टीत आल्या पासूनच वेगवेगळ्या भूमिका स्विकारणाऱ्या सोनालीने, आणखी एक वेगळा प्रयाग करून पहावा यासाठी या भूमिकेला होकार दिला. खऱ्या आयुष्यात मात्र सलमानच्या आईची भूमिका साकारणारी सोनाली सलमानपेक्षा वयाने बरीच लहान आहे.